मनोज जरांगेंची “हि” मागणी सरकारने मान्य केली तर ओबीसी समाजाच रस्त्यावर उतरण्याचा इशारा

Manoj Jarange warned that if the government accepts this demand, the OBC community will take to the streets

 

 

 

 

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी परत आता चार तारखेला आंदोलनाचा इशारा दिला आहे. मात्र, मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या दडपशाहीला बळी पडून सरकारने सगेसोयरेंबाबतचा निर्णय घेतला तर,

 

 

ओबीसी समाज रस्तावर उतरेल, असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे. सगेसोयरेंच्या निर्णयाचा परिणाम ओबीसी आरक्षणावर होणार आहे.

 

 

 

 

कुठल्याही परिस्थितीमध्ये या आंदोलनाच्या धडपशाहीला त्याठिकाणी बळी पडून जर सरकारने असं काही निर्णय घ्यायचा प्रयत्न केला, तर OBC समाज जो आहे तो पुन्हा रस्त्यावर उतरेल, असंही प्रकाश शेंडगे यांनी म्हटलं आहे.

 

 

 

प्रकाश शेंडगे म्हणाले, ओबीसी बहुजन पार्टी हा आमचा पक्ष लोकसभा निवडणुकीत नवीन असताना देखील आम्ही 16 उमेदवार उभे केले आहेत. 13 उमेदवार आमच्या पक्षाच्या चिन्हावर लढलेत.

 

 

या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही मैदानामध्ये आहोत. ओबीसी बहुजन पार्टी निवडणुकीत उतरली आहे. ही निवडणूक कमी वेळामध्ये साधनं आणि आर्थिक मदत नसताना आम्ही एवढा मोठा प्रमाणात ही निवडणूक लढलो.

 

 

 

जय आणि पराजयाची आम्हाला चिंता नाही. किंवा त्याचा पर्वाही नाही. येणारी विधानसभा निवडणूक मात्र पूर्ण ताकतीने लढणार आहोत.

 

 

 

 

उद्या आमची कार्यकारणीची बैठक आहे, त्यामध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला कशा पद्धतीने समोर जायचं, याची रडनीती ठरणार आहे.

 

 

 

 

पुढे बोलताना प्रकाश शेंडगे म्हणाले, ओबीसींच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर जिल्ह्याजिल्ह्यामध्ये शासनाच्या विरोधात आंदोलन करून या ठिकाणी प्रचंड मोठा उद्रेक होईल.

 

 

 

 

त्यातून जे काय परिणाम होतील सर्व जबाबदारी महाराष्ट्र सरकारवर असेल. कुणबी आणि मराठा हे हा एकच आहे, असा विषय आलेला आहे. पुढे पण हा विषय सुप्रीम कोर्टाने आणि हायकोर्टाने निकालात लावलेला आहे.

 

 

 

 

खत्री कमिशनने कुणबींमध्ये मराठा येत नाही, अशा अहवालात त्या मेन्शन केला आहेत. येत्या मंगळवारी आमचे शिष्टमंडळ पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांसह

 

 

 

दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आणि भुजबळ साहेबांना भेटणार आहे. आता नवीन विषय चालू आहे ते ताबडतोड थांबवण्यासाठी आम्ही विनंती करणार आहेत.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *