पाहा राज्यातील सर्वांत श्रीमंत उमेदवाराची संपत्ती किती?

See the wealth of the richest candidate in the state?

 

 

 

घाटकोपर पूर्व मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले पराग शहा हे राज्यातील सर्वांत श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. शहा यांची स्वतःची २,१७८.९८ कोटी रुपयांची तर,

 

पत्नीची १,१३६.५४ कोटी रुपयांची संपत्ती आहे. यातील बहुतेक संपत्ती ही शेअर्स आणि इतर गुंतवणुकीशी संबंधित आहे. शहा यांची संपत्ती पाच वर्षांत दहापटीने वाढली आहे.

 

शहा यांनी मंगळवारी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती स्पष्ट झाली आहे. शहा यांच्या नावावर असलेल्या मालमत्तेचे मूल्य ३१ कोटी तर,

 

पत्नीच्या नावावर असलेल्या मालमत्तेचे मूल्य ३४.१७ कोटी रुपये आहे. शहा यांच्यावर एक लाख रुपयांचे तर, पत्नीच्या नावावर ३६.९० लाख रुपयांचे कर्ज आहे.

 

२०१९शी तुलना केली तर शहा यांच्या संपत्तीत दहापटीने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यावेळी शहा यांनी २३९ कोटी रुपयांची तर, पत्नीच्या नावावर १६० कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती.

 

तर कौटुंबिक संपत्ती २३ कोटी रुपयांची होती. त्यांच्याकडे असलेल्या स्थावर मालमत्तेचे मूल्य ३० कोटी तर पत्नीच्या नावे मालमत्तेचे मूल्य ३६.६४ कोटी रुपये होते.

 

मिलिंद देवरा यांनी शिवसेनेकडून वरळी या मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या प्रतिज्ञापत्रात स्वतःकडे १३१ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले आहे.

 

यातील ७३ कोटी रुपयांची संपत्ती ही गुंतवणुकीच्या स्वरूपात आहे. तर पत्नीच्या नावावर २९.९५ कोटी रुपयांची संपत्ती असून त्यातील १७ कोटी रुपये गुंतवणुकीच्या स्वरूपात आहे.

 

तर मिलिंद यांच्या नावावर असलेल्या मालमत्तेचे मूल्य १५.४३ कोटी रुपये तर पत्नीच्या नावावर असलेल्या संपत्तीचे मूल्य ८.५६ कोटी रुपये आहे.

 

देवरा यांच्यावर कुठलेही कर्ज नाही. परंतु, त्यांनी ५३ कोटी रुपयांचे कर्ज इतरांना दिले आहे. तर त्यांच्या पत्नीने ८.४२ कोटी रुपयांचे कर्ज इतरांना दिले आहे.

 

 

शिवसेनेकडून मुंबादेवी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या शायना एनसी यांनी स्वतःकडे १७.४५ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. तर,

 

पती मनीष मुनोत यांच्याकडे ३८.८९ कोटी रुपयांची, कौटुंबिक संपत्ती १८.३४ कोटी रुपयांची तर मुलगा अयानच्या नावावर १.३८ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे.

 

शायना यांच्या नावावर असलेल्या स्थावर मालमत्तेचे मूल्य २३.७१ कोटी रुपये तर, पतीच्या नावावर असलेल्या संपत्तीचे मूल्य ३९.९० कोटी रुपये आहे.

 

तसेच मुलाच्या नावावर असलेल्या संपत्तीचे मूल्य ६.५७ कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहे. वारसा हक्काने मिळालेल्या संपत्तीचे मूल्य ३८ लाख रुपये असून

 

पतीच्या नावावर असलेल्या संपत्तीचे मूल्य २५ लाख रुपये आहे. शायना यांच्यावर २.२७ कोटी रुपयांचे, पतीवर १६ कोटी रुपयांचे, कुटुंबावर ३.५३ कोटी रुपयांचे तर, मुलावर ३२ लाख रुपयांचे कर्ज आहे.

 

मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या नवाब मलिक यांच्या संपत्तीत काहीशी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. नवाब यांनी स्वतःकडे १.८५ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली असून

 

पत्नी मेहजबीन यांच्या नावावर २.२९ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. त्यांच्या नावावर असलेल्या स्थावर मालमत्तेचे मूल्य ३.४१ कोटी रुपये तर,

 

पत्नीच्या नावावर असलेल्या मालमत्तेचे मूल्य ५१.६२ कोटी रुपये आहे. नवाब यांच्यावर १.३७ कोटी रुपयांचे कर्ज असून त्यांच्या पत्नीच्या नावावर ११ लाखांचे कर्ज आहे.

 

२०१९मध्ये मलिक यांनी आपली संपत्ती ३७ लाख तर, पत्नीच्या नावावर १.५३ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले होते.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *