अजित पवारांचा शरद पवारांना खोचक टोला !
Ajit Pawar's prank on Sharad Pawar!

मी 60 वर्षाचा झाल्यावर भूमिका घेतली. काहींनी 38 व्या वर्षी वसंत दादांना मागे सारले असं वक्तव्य करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांना टोला लगावला.
वसंतदादा देखील चांगलं नेतृत्व होतं, त्यांना देखील बाजूला केलं गेलं आणि जनता पक्षाचं सरकार आलं. तुम्ही 40 च्या आत निर्णय घेतला, मी तर 60 च्या नंतर निर्णय घेतला. त्यामुळं तुम्ही मला समजून घेतले पाहिजे असे अजित पवार म्हणाले.
मी मागेही सांगितले आहे की काळ बदलत असतो. एक वर्ष चर्चा सुरु होती. मी घेतलेला निर्णय योग्य होता म्हणून इतकी लोकं माझ्यामागे आली असल्याचे अजित पवार म्हणाले.
मी त्यांना काय दमदाटी केली का? भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आपल्यासोबत आल्याचे अजित पवार म्हणाले. सत्तेचा फायदा आपल्याला होतोय. आजूबाजूच्या तालुक्याची आणि आपली परिस्थिती बघा असे अजित पवार म्हणाले.
आता इथून पुढं फक्त माझं ऐका बाकी कोणाचं एकू नका असेही अजित पवार म्हणाले. इतके वर्ष बाकीच्यांचं खूप एकल्याचे अजित पवार म्हणाले. मी तुम्हाला असं काही करुन दाखवतो असेही अजित पवार म्हणाले.
प्रत्येकाचा एक उमेदीचा काळ असतो. आम्ही आत्तापर्यंत वरिष्ठांनी सांगेल तसेच काम करत आल्याचे अजित पवार म्हणाले. 1967 ला बारामतीमधून नवीन नेतृत्व (शरद पवार) 17000 मतांनी निवडून आले.
1972 ला 34000 ने निवडून आले. 1978 साली 18000 ने निवडून आले. नंतर 1980 साली 25000 निवडून आले. त्यानंतर 1985 ला 18000 आले.
1987 नंतर ती जागा 1 लाख मतांनी निवडून येऊ लागल्याचे अजित पवार म्हणाले. मलाही खासदार म्हणून साडेतीन लाखांनी तुम्ही निवडून दिल्याचे अजित पवार म्हणाले.
तुम्ही मला आजपर्यंत भरभरुन आशिर्वाद दिले आहेत. आता तुम्हाला एक निर्णय घ्यावा लागेल. इकडं पण तिकडं पण चालणार नाही. ज्यांना माझ्याकडे यायचे त्यांनी यावं असे अजित पवार म्हणाले.
मी जे काही करेल त्या बारामतीकरांच्या हिताच्याच घेईल असे अजित पवार म्हणाले. देशपातळीवर नरेंद्र मोदी यांच्याइतके कणखर दुसरे नेतृत्व नाही.
आज माझ्याबरोबर 53 पैकी 43 आमदार आले आहेत. दोन अपक्ष आमदार आले आहेत अंसे अजित पवार म्हणाले. नऊ विधानपरिषद आमदारापैकी
सहा आमदार माझ्याबरोबर आल्याचे अजित पवार म्हणाले. वरिष्ठ नेत्यांबरोबर नव्या दमाचे आमदारही माझ्याबरोबर आल्याचे अजित पवार म्हणाले.