अजित पवारच्या नादी लागू नको,मी जर तुझ्या मागे लागलो…..
Don't apply Ajit Pawar's Nadi, if I follow you.....
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी आले होते.
सुजय विखे पाटलांचा प्रचार करताना अजित पवारांनी निलशे लंके यांना थेट इशारा दिला आहे. अजित पवारांचं भाषण सुरू असताना पावसाला सुरूवात झाली, पण तरीही अजित पवारांनी त्यांचं भाषण सुरूच ठेवलं.
‘मार्केट कमिटीमध्ये जर कुणीही चुका केल्या असतील तर, माझ्या शेतकऱ्यांच्या मालकीची मार्केट कमिटी आहे. कुणाच्या बापाच्या घरची नाही,
त्यामुळे त्याची इनक्वायरी होईल. कारण नसताना कुणाला त्रास दिला जाणार नाही. कुणी तिथे पैसा खाल्ला असेल तर अशांना चक्की पिसिंग ऍण्ड पिसिंग’, असा इशारा अजित पवारांनी दिला.
‘मागच्या वेळी आमदारकीच्या वेळीस माझीही चूक झाली. मला निलेशने सांगितलं की मला तुमच्या पक्षामध्ये घ्या. आमची इकडे चार दिशेला चार तोंडं होती.
या सगळ्यांना एकत्र आणणं मला महाकठीण गेलं होतं. अनेकांनी मला सांगितलं दादा निलेशला तिकीट द्या. तुमच्यातले अनेक जण तेव्हा आले होते.
तुमच्या प्रेमाखातर तुमच्या आग्रहाखातर मी त्याला उमेदवारी दिली. मला वाटलं नव्हतं की बाबा नंतर असे दिवे लावेल’, असा टोला अजित पवारांनी निलेश लंकेंना लगावला.
‘गडी दिसायला दिसतो बारका, पण लय पोहोचलेला आहे. मी त्याला विकासकामाकरता निधी द्यायचो. मला एक दिवस घरी घेऊन गेला, किती साधं घर आहे.
कसे माझे आई-वडील आहेत, कसा माझा प्रपंच आहे, सगळं दाखवलं. मला वाटलं काम करतोय, पण नंतर त्याची एक एक लक्षण कळायला लागली.
आमदार झाल्यावर लोकांना दमदाटी करायची. महाविकासआघाडीचे उमेदवार आमच्या कार्यकर्त्यांना उघड धमक्या देत आहेत’, असं अजित पवार म्हणाले.
‘कलेक्टरना मान द्यायचा असतो त्यांना ए कलेक्टर म्हणतो, पोलिसांना तुमचा बाप येतो म्हणतोय. अरे बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे.
तू धमक्या देऊन माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला आणि मी जर तुझ्या मागे लागलो. तुला सतत अजित पवार डोळ्यासमोर येईल. अजित पवारच्या नादी लागू नको.
जे माझ्या नादी लागले त्यांचा पुरता बंदोबस्त केला आहे. तू तर किस झाड की पत्ती है. तू काय समजतोस स्वत:ला. मी जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे. तू जर माझ्या कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लावला तर तुला बघून घेईन’, असा थेट इशारा अजित पवारांनी निलेश लंकेंना दिला.
‘आचारसंहिता संपल्यानंतर मी सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. आता तर तो आमदारही नाही, त्याची अरेरावी अधिकाऱ्यांनी सहन करण्याचं कारण नाही’, असं अजित पवार म्हणाले. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी अजित पवार पारनेरमध्ये आले होते.