पहिल्यांदाच अजित पवारांनी सांगितले भाजपसोबत जाण्याचे कारण

For the first time, Ajit Pawar told the reason for going with BJP

 

 

 

रायगडच्या कर्जतमध्ये बुधवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. अजित पवारांचा पुन्हा एकदा राज्यभर दौरा सुरु होत असून

 

 

 

 

त्यानिमित्त कर्जतमध्ये निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. ‘घड्याळ तेच वेळ नवी’ ही टॅगलाईन घेऊन अजित पवार गट राज्यभर दौरे करणार आहे.

 

 

 

या कार्यक्रमावेळी बोलताना अजित पवार यांनी शरद पवार यांचं नाव न घेता भाष्य केलं. पक्षातल्या बंडाबद्दल बोलताना ते म्हणाले की, लोकशाहीत काम करताना बहुमताचा आदर करावा लागतो,

 

 

 

हे आम्ही आमच्या वरिष्ठांना सांगत होतो. पण त्यांनी आमचं ऐकलं नाही. राजकीय भूमिका घ्याव्या लागतात. नितीश कुमार, जयललिता, ममता बॅनर्जी यांनीही त्या-त्या राजकीय परिस्थितीनुसार भूमिका घेतल्या.

 

 

 

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, सत्तेतून लोकांची कामं करणं ही आमची भूमिका आहे. हातावर हात ठेऊन विरोध करत राहणं ही आमची भूमिका नाही.

 

 

 

त्यामुळं परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागतो, आपणदेखील निर्णय घेतला आहे. आपली विचारधारा पक्की ठेऊन आपल्याला काम करता येणार आहे.

 

 

 

यशवंतराव चव्हाण यांचा विचार घेऊन पूढे जात असू तर मग सत्तेत सहभागी झालो तर बिघडलं कुठं? असं त्यांनी स्पष्ट केलं.

 

 

 

रायगडमध्ये अनेक उद्योग येत आहेत. इतर उद्योग राज्यात येण्यासाठी आमची चर्चा सुरू आहे. राज्यात समाधानाचे चित्र दिसले पाहिजे, केवळ विरोधाला विरोध ही माझी भूमिका नाही. मराठा समाजाला आरक्षण हवंय, ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, यासाठी भूमिका मांडली जात आहे

 

 

 

मुख्यमंत्री यांनी बैठक घेतली तेव्हा हीच भूमिका अनेकांनी मांडली,मतमतांतरे असतील, विचार पटले नाहीत तरी चर्चा व्हायला हवी,मला डेंग्यू झाला तेव्हा अजित पवारांना राजकीय डेंग्यू झाला अशी चर्चा झाली,मी असा काही लेचापेचा नाही, जे आहे ते तोंडावर आहे

 

 

 

कर्जतमधील निर्धार सभेत बोलताना अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केल्याची चर्चा होऊ लागली आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून फुटून वेगळी चूल मांडली आहे. ते सध्या महायुतीसोबत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीनंतर तुमच्या मनातील निवडणूक आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत.

 

 

 

इथली मुलं वेगवेगळी घोषणा देत होती. पण, त्याबद्दल कोणतीही काळजी करु नका. कारण, आधी लोकसभेची निवडणूक आहे. त्यानंतर तुमच्या मनातील निवडणूक आहे. पण, आम्ही लोकांच्या मनामध्ये काय आहे हे जाणणारी माणसं आहोत, असं अजित पवार म्हणाले.

 

 

 

 

यापुढे देखील आमची विचारधारा शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची असेल. राजकीय युती ही प्रत्येक पक्षाला त्या त्या वेळची राजकीय परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा लागतो.

 

 

 

नितीश कुमार यांनी वेगळी भूमिका घेतली. ममता बॅनर्जी, जयललिता यांनी वेगळी भूमिका घेतल्याचं आपण पाहिलं आहे. तसेच महाराष्ट्रात देखील १९७८ पासून वेगळ्या पक्षांची युती आपण पाहिली आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा लागतो. कोणताही पक्ष यातून सुटला नाही, असं ते म्हणाले.

 

 

 

लोकशाहीमध्ये काम करत असताना बहुमताचा आदर करायचा असतो. हे आम्ही आमच्या वरिष्ठांसकट सर्वांना सांगत होतो. पण, काहींनी ऐकलं आणि काहींनी ऐकलं नाही.शेवटी लोकांचे प्रश्न सुटावेत त्यामुळे आम्हाला ही वेगळी भूमिका घ्यावी लागली आहे, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *