महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाबाबत ‘नाना पटोले म्हणाले “जाहीरपणे सांगतो…

Nana Patole said about the post of Chief Minister of Mahavikas Aghadi "I am openly saying...

 

 

 

राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुती आणि महाविकाआघाडीत जोरदार मोर्चेंबांधणी सुरु आहे.

 

त्यातच आता महाविकासआघाडीकडून मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण असणार याबद्दल विविध चर्चा रंगत आहेत. काही दिवसांपूर्वी महाविकासआघाडीतील घटक पक्ष असलेल्या

 

काँग्रेसकडून मुख्यमंत्रि‍पदावर दावा करण्यात आला होता. आता काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्रि‍पदाबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे.

 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच एक महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेवेळी नाना पटोले, शरद पवार, उद्धव ठाकरे यांसह महाविकासआघाडीतील अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते.

 

 

यावेळी नाना पटोले यांना महाविकासाआघाडीचा मुख्यमंत्रि‍पदासाठीचा चेहरा कोण असणार याबद्दल विचारणा करण्यात आली. यावर त्यांनी स्पष्टपणे भाष्य केले.

 

“आम्ही एक आहोत. आम्ही मुख्यमंत्री एकमताने ठरवू. हे जाहीरपणे सांगतो. महाराष्ट्र वाचवायचा आहे. महाराष्ट्र धोक्यात आहे. मोदी आणि शाह

 

यांचा विचार अंमलात आणणार आहोत. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची आमच्यासाठी महत्त्वाची नाही. खोकेवाल्यांसाठी आहे”, असे नाना पटोले यांनी म्हटले.

 

“त्यांनी महिन्याभरात २७८ निर्णय घेतले. अनेक महामंडळं जाहीर केले. फडणवीस हे मुख्यमंत्री होते, त्यातील एक तरी महामंडळ सुरू आहे का, एकाला तरी निधी दिली का हे तपासलं पाहिजे.

 

 

बंजारा समाजाच्या पोहरादेवीला मोदी आले. नगाराचा कार्यक्रम बाजूला राहिला. शरद पवार आपण अनेक योजना राबवल्या. कृषी मंत्री झाले.

 

दर हफ्त्याला योजनांचा इव्हेंट करत नाही. मोदींना ते केलं. मोदींनी पोहरादेवीत राजकीय भाषण केलं. त्याला बंजारा समाजात प्रचंड राग आहे. राजकीय इव्हेंट केले जात आहे. महाराष्ट्र हे खपवून घेत नाही”, असेही नाना पटोलेंनी सांगितले.

 

यासोबतच उद्धव ठाकरे यांनीही मुख्यमंत्रि‍पदाच्या चेहऱ्याबद्दल भाष्य केले. महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करू द्या. भाजपची दयनीय अवस्था झाली आहे.

 

गद्दार आणि चोरांचा चेहरा मानत आहेत. त्यांच्या नेतृत्वात लढत आहेत. ही निवडणूक महाविकास आघाडी आणि महायुती होणार आहे.

 

आमच्याकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अपेक्षित करत आहेत. ते सत्ताधारी आहे. त्यांनी त्यांचा चेहरा जाहीर करू द्या. आमचा आम्ही लगेच करू, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

 

 

काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीचा मेळावा झाला होता. त्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केली होती.

 

परंतु त्यावेळी शरद पवार आणि काँग्रेसकडून उद्धव ठाकरे यांच्या मागणीची दखल घेतली गेली नाही. आता महाविकास आघाडी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कधी जाहीर करणार? त्याचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिली.

 

आधी महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर होऊ द्या, त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करु,

 

असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. यामुळे काँग्रेस अन् राष्ट्रवादी काँग्रेस दखल घेत नसल्याने उद्धव ठाकरे यांनी आपल्या मागणीवरुन यू टर्न घेतल्याचे दिसून येत आहेत.

 

 

महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करू द्या. भाजपची दयनीय अवस्था झाली आहे. गद्दार आणि चोरांचा चेहरा मानत आहेत. त्यांच्या नेतृत्वात लढत आहेत.

 

ही निवडणुक महाविकास आघाडी आणि महायुती होणार आहे. आमच्याकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अपेक्षित करत आहेत. ते सत्ताधारी आहे. त्यांनी त्यांचा चेहरा जाहीर करू द्या. आमचा आम्ही लगेच करू.

 

मी सतत महाराष्ट्रात हिंडतोय. इतर सहकारी फिरत आहे. माझं निरीक्षण असं आहे की लोकांना परिवर्तन हवं आहे. लोकसभेच्या निकालाआधी कोणी मान्य करत नव्हतं. पण निकाल आला

 

. आम्ही ३१ जागा जिंकलो याचा अर्थ लोकांना बदल हवा होता. आताही विधानसभेत हा बदल होणार हे नक्की आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा चेहऱ्याबाबत उत्तर दिलं. उत्तर दिलं तेच आमचं उत्तर आहे. नाना पटोले यांनीही त्याचे उत्तर असल्याचे सांगितले.

 

 

आम्ही एक आहोत. आम्ही मुख्यमंत्री एकमताने ठरवू. हे जाहीरपणे सांगतो. महाराष्ट्र वाचवायचा आहे. महाराष्ट्र धोक्यात आहे. मोदी आणि शाह यांचा विचार अंमलात आणणार आहोत.

 

मुख्यमंत्रीपदाची खुर्ची आमच्यासाठी महत्त्वाची नाही. खोकेवाल्यांसाठी आहे. त्यांनी महिन्याभरात २७८ निर्णय घेतले. अनेक महामंडळं जाहीर केले. फडणवीस हे मुख्यमंत्री होते, त्यातील एक तरी महामंडळ सुरू आहे का, एकाला तरी निधी दिली का हे तपासलं पाहिजे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *