निवडणूक प्रचारादरम्यान नागपूरमध्ये ‘हलबा- मुस्लिम भाई- भाई’चे नारे,काय आहे प्रकरण ?

Slogans of 'Halba-Muslim Bhai-Bhai' in Nagpur during the election campaign

 

 

 

 

भारत- चीन सीमेवर ‘हिंदी- चिनी भाई- भाई’चे नारे लागल्याचे आपण अनेक चित्रपट वा प्रसिद्धीमाध्यमातून बघितले असेल. परंतु या नाऱ्याच्या धर्तीवर प्रथमच मध्य नागपुरातील

 

मुस्लिम बहुल मोमीनपुऱ्यात ‘हलबा- मुस्लिम भाई- भाई’चे नारे लागत आहे. मध्य नागपूर विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान हे नारे का लागले, याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊ.

 

महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार थंडावला आहे. यंदाच्या निवडणुकीत मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे प्रवीण दटके, काँग्रेस तर्फे बंटी शेळके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

 

तर भाजप व काँग्रेस या प्रमुख राजकीय पक्षांनी यंदा येथून लक्षणीय संख्येत असलेल्या हलबा समाजाला उमेदवारी नकारल्याने

 

या समाजातर्फे रमेश पुणेकर यांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरवण्यात आले आहे. त्यामुळे येथील लढत आता तिरंगी झाली आहे.

 

हलबा समाजाचा प्रमुख व्यवसाय विणकराचा आहे. मतदारसंघातील मोमीनपुरात आजही मोठ्या संख्येने विणकरीशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जुडलेल्या मुस्लिम समाजातील विणकरांची संख्या जास्त आहे.

 

त्यामुळे हलबा समाजात विणकरी करणाऱ्या नागरिकांकडून त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असलेल्या मुस्लिम समाजातील विणकर कुटुंबियांना अपक्ष उमेदवार रमेश पुणेकर यांच्या बाजूने वळवण्यासाठी प्रचारात विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

 

त्यानुसार मुस्लिम बहुल भागात रमेश पुणेकर यांच्या प्रचारादरम्यान हलबा- मुस्लिम भाई- भाई, विणकर एकता जिंदाबाद आणि इतरही नारे दिले जाते.

 

याप्रसंगी हलबा समाजाच्या उमेदवाराच्या रॅलीत मुस्लिम समाजातील विणकरही सहभागी झाले होते. परंतु निवडणुकीतील मतदानात मुस्लिम समाजाची

 

मते रमेश पुणेकर यांना मिळणार काय? मिळाल्यास किती प्रमाणात मिळणार? याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.

हलबा समाज आणि मुस्लिम समाजाकडून आजही मध्य नागपुरातील काही हलबा बहुल आणि काही मुस्लिम बहुल भागात कमी- अधिक प्रमाणात हातमाग आणि पावरलूमशी संबंधित साड्या,

 

नववारी पातळ, दरी, लुंगीसह कापड निर्मिती केली जाते. विणकरीमधील हातमागाचे उत्पादन आता मागणी नसल्याने खूपच कमी झाले आहे. परंतु आजही पावरलुमचा आवाज हलबा

 

आणि मुस्लिम लोकसंख्या असलेल्या अनेक भागात एकू येतो. या व्यवसायानिमित्त हलबा समाज आणि मुस्लिम समाजाचे स्नेहाचे संबंध आहेत.

 

त्यामुळे नागपूर जिल्ह्यात एकही विधानसभेची जागा न दिल्याने नाराज असलेल्या मुस्लिम समाजालाही हलबा उमेदवाराकडे वळवण्याचे प्रयत्न या नाऱ्याच्या निमित्याने यंदाच्या प्रचारात झाले आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *