फडणवीसांनी केल्या शिंदेंच्या 3 महत्वाकांक्षी योजना बंद

Fadnavis shut down Shinde's 3 ambitious plans

 

 

 

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांच्या कार्यकाळात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी अनेक योजना सुरु करण्यात आल्या होत्या.

 

ज्यामध्ये सणासुदीच्या वेळी आनंदाचा शिधा, ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थाटन योजना आणि 10 रुपयांमध्ये शिवभोजन थाळी योजना.

 

मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने निधी न दिल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातील योजना बंद पडण्याची शक्यता आहे. या योजना केवळ आता कागदावरच उरल्या आहेत.

 

एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळात सत्तेवर असताना लोकसभा आणि विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी अनेक लोकप्रिय योजना जाहीर केल्या होत्या.

 

त्यामुळे या निवडणुकांमध्ये महायुती सरकारला मोठं यश मिळालं. एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना मोफत वीज, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना

 

आणि महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत अशा योजना सुरु केल्या होत्या. या योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सुरु ठेवल्या आहेत.

 

मात्र, या योजना निवडणूक काळात मतांवर डोळा ठेवण्यासाठी जाहीर केल्या होत्या. त्यामुळे राज्याच्या आर्थिक तिजोरीवर मोठ्या प्रमाणात ताण पडला आहे.

 

त्यामुळे आता महायुती सरकारने या योजना फक्त कागदावर सुरु ठेवून पुरेसा निधी न देता बंद करण्याचे ठरवले असल्याचं प्राथमिक माहितीत समोर आलं आहे.

 

एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात दसरा, दिवाळी, गणेशोत्सव, गुढीपाडवा आणि शिवजयंती अशा सणांसाठी आनंदाचा शिधा वाटप करण्यात येत होते.

 

या योजनेवर सुमारे 602 कोटी रुपये खर्च करण्यात येत होते. मात्र, आता गुढीपाडवा आला तरी आनंदाचा शिधा योजनेसाठी निधीचा निर्णय घेण्यात आला नाही. अर्थमंत्र्यांच्या भाषणामध्ये आणि तरतुदींमध्ये याचा उल्लेख नाही.

 

त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी सुरु केलेली 10 रुपयांमध्ये शिवभोजन थाळी ही योजना एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांच्या कार्यकाळात सुरु ठेवली होती.

 

मात्र, आता या योजनेसाठी देखील निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. तसेच एकनाथ शिंदे यांनी सुरु केलेली ज्येष्ठ नागरिकांना तीर्थाटनाची योजनेचा देखील बंद होणार असल्याचं म्हटलं जात आहे. निधीमध्ये अर्थमंत्र्यांनी या योजनेचा उल्लेख केलेला नाही.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *