सरकारमधील महायुतीच्या घटक पक्षाचे नेताच म्हणाला ;महायुतीला हवं तस यश मिळणार नाही

The leader of the component party of the Mahayuti in the government said that the Mahayuti will not get the success it wants

 

 

 

 

महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीचा प्रचार थंडावला आहे. त्यामुळे आता निकाल काय लागणार याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

 

 

 

 

पण महायुतीला हवं तसं यश मिळालं नाही, महायुतीला भरघोस यश मिळणार नाही, असं म्हणत प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी महायुतीला घरचा अहेर दिला आहे.

 

 

 

 

सचिन तेंडूलकरच्या सुरक्षारक्षकाने आत्महत्या केल्यामुळे या प्रकरणी बच्चू कडू यांनी सचिनने केलेल्या रम्मीच्या जाहिरातीवर आक्षेप घेतला आहे. या प्रकरणी माध्यमांशी बोलत असताना लोकसभा निवडणुकीच्या निकालावर भाकित वर्तवलं आहे.

 

 

 

‘आम्हाला असं वाटत होतं महायुतीला भरघोस मतं मिळतील. जास्त जागा मिळेल अशी अपेक्षा होती, पण असं काही घडलं नाही. लोकांच्या नाराजी समोर आल्या आहेत.

 

 

 

 

 

दोन्ही पक्षाला धार्मिकतेवर नेण्याचा प्रयत्न केला. मुद्यांपासून निवडणुका दूर राहिल्या आहे. त्यामुळे निकाल कुणाच्या बाजूने लागेल हे सांगता येणार नाही, असं बच्चू कडू म्हणाले.

 

 

 

‘मी एकनाथ शिंदे आणि राहुल शेवाळे यांच्या प्रचारामध्ये हजर होते. मला असं वाटतं की, ही निवडणूक ही धर्मयुद्धाप्रमाणे लढली गेली आहे. जातीपातीच्या राजकारणाचं मोठं उत्तेजन मिळालं आहे.

 

 

जातीचे आणि धर्माचे राजकारण केले गेले आहे. काँग्रेस आणि भाजपकडूनही झालं आहे. मुळ मुद्यापासून निवडणूक दूर केली.

 

 

 

 

एवढ्या मोठ्या मुंबई शहरात पाय लांबून बसावं असं घर मिळत नाही. 6/7 लाख आजही फुटपाथवर झोपतात. हा मुद्दा निवडणुकीत यायला पाहिजे होता पण तो आला नाही.

 

 

आम्ही जून महिन्यात आता आंदोलन करणार आहोत. गोदरेजची 3 हजार एकर जमीन आहे ती इंग्रजांकडून मिळाली आहे. ती सरकारकडे जमा केली पाहिजे.

 

 

 

 

 

ही जमीन गोरगरिबांना मिळाली पाहिजे. यासाठी आम्ही आंदोलन पुकारणार आहोत, असा इशाराही बच्चू कडूंनी दिला.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *