अजित दादांच्या विरोधात उमेदवारी जाहीर होताच पुतण्या युगेंद्र पवारांचा पहिला हल्ला

Nephew Yugendra Pawar's first attack as soon as his candidature against Ajit Dada was announced

 

 

 

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षाची पहिली 45 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये, शिवसेना ठाकरे गटाप्रमाणेच शरद पवारांनीही राष्ट्रवादीच्या अजित पवारांना तगडं आव्हान दिलंय.

 

सर्वाचं लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात थेट अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार म्हणजेच काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होणार आहे.

 

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया देत युगेंद्र पवार यांनी अजित पवारांना लक्ष्य केलंय. दुसरीकडे विदर्भात मंत्री धर्मराव आत्राम यांच्याविरुद्ध त्यांच्या लेकीलाच शरद पवारांनी मैदानात उतरवलं आहे.

 

अहेरी मतदारसंघातून भाग्यश्री आत्राम यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे, महायुती विरुद्ध महाविकास आघाडीच्या लढाईत घड्याळाला तुतारीचं मोठं आव्हान निर्माण झालंय.

 

त्यातच, युगेंद्र पवार यांनी अजित पवारांवर तोफ डागली आहे. त्यामुळे, बारामतीमधील लढत रंगतदार आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत लक्षवेधी होणार आहे.

 

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर युगेंद्र पवार यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीसोबत संवाद साधला, खरंतर पवारसाहेब व राष्ट्रवादी पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला,

 

त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि विनम्रपणे हा निर्णय स्वीकार करतो. मला दिलेल्या संधीचं सोनं करीन, पवारसाहेबांना माझा अभिमान वाटेल असं काम मी करेन,

 

असे युगेंद्र पवार यांनी म्हटलंय. मुद्दे अनेक आहेत, बारामतीमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, 25 गावांत प्यायला पाणी नाही. बेरोजगारीचा मुद्दा आहे, शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही.

 

शिक्षणात आपण जोर दिला पाहिजे. तसेच, भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचारा प्रश्न मोठा आहे. बारामतीमध्ये वाढलेला भ्रष्टाचार,

 

स्थानिक पातळीवरील हा भ्रष्टाचार वाढलाय तो संपवायचा आहे, असे म्हणत युगेंद्र पवारांनी नाव न घेता अजित पवारांवर तोफ डागली.

 

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाची पहिली उमेदवारी यादी बुधवारी जाहीर झाली, त्यामध्ये अजित पवारांना बारामतीमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

 

तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून युगेंद्र पवारांना विधानसभेच्या मैदानात उतरवण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकांपासूनच युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी बारामतीत लढत होईल, अशी चर्चा होती.

 

त्यानुसार आता ही लढत निश्चित झाली असून पवार विरुद्ध पवार असा सामना होत आहे. दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *