भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा बँक घोटाळा’; ग्राहकांच्या पायाखालची जमीन सरकली

Biggest Bank Scam in India's History'; The ground shifted under the feet of the customers

 

 

 

 

जगभरात सध्या आर्थिक मंदीची लाट आणि त्याचे परिणाम याचीच चर्चा होत असताना इथं भारतात सर्व बँकांमध्ये सर्वोच्च स्थानी असणाऱ्या रिझर्व्ह बँक (RBI) आणि इतर दोन बड्या बँकांना

 

 

 

मंगळवारी धमकीचे ई मेल आले आणि हे प्रकरण थेट पोलिसांपर्यंत जाऊन पोहोचलं. लाखोंच्या संख्येनं कर्मचाऱ्यांचे Sallary Account असणाऱ्या या बँकांना आलेल्या धमकीनंतर अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली.

 

RBI सह धमकीचे ई मेल आलेल्या बँकांमध्ये HDFC आणि ICICI या दोन बँकांचा समावेश असून मेल पाठवणाऱ्यांकडून आरबीआय आणि या दोन्ही खासगी बँकांवर भारताच्या इतिहासातील आतापर्यंतचा

 

 

सर्वात मोठा घोटाळा करण्याचा गंभीर आरोप केला आहे. इतकंच नव्हे, तर मेल पाठवणाऱ्याकडून देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईमधील 11 ठिकाणांवर बॉम्ब ठेवल्याचीही धमकी देण्यात आली.

 

 

इतक्यावरच न थांबता खळबळ माजवणारा मेल पाठवणाऱ्यांकडून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह आरबीआयच्या गव्हर्नरपदी असणाऱ्या शक्तिकांता दास आणि या कथित घोटाळ्यामध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांच्या निलंबनाचीही मागणी करण्यात आली.

 

 

 

‘आरबीआयचे गव्हर्नर आणि देशाच्या अर्थमंत्री या दोघांनीही तातडीनं त्यांच्या पदाचा राजीनामाद्यावा आणि एका जाहीर पत्रकाच्या माध्यमातून या घोटाळ्याला वाचा फोडावी.

 

 

या घोटाळ्यामध्ये सहभागी असणाऱ्या प्रत्येकाला शासनानं कडक शासन करावं’, असं त्या धमकीवजा ईमेलमध्ये लिहिण्यात आल्याचं वृत्त Mint नं प्रसिद्ध केलं.

 

 

धमकीचा ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तिकडून मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा उल्लेख केल्यामुळं यंत्रणाही खडबडून जाग्या झाल्या. फोर्ट येथे असणारी आरबीआयची नवी मध्यवर्ती इमारत,

 

 

 

चर्चगेटजवळील एचडीएफसी हाऊस, वांद्रे कुर्ला संकुल येथील आयसीआयसीआय बँक टॉवर्स या ठिकाणांचा उल्लेख या मेलमध्ये करण्यात आला होता.

 

 

 

हा मेल पाहताक्षणी तातडीनं मुंबई पोलिसांची पथकं संबंधित 11 ठिकाणांवर पाठवण्यात आली आणि तिथं झाडाझडतीसुद्धा घेण्यात आली.

 

 

पण, कोणतीही संशयास्पद गोष्ट यावेळी तपासात समोर आली नाही. दरम्यान, सदर प्रकरणी पोलीस तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास सुरु असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *