महाराष्ट्रात 53.71 टक्के मतदान ; पाहा मतदारसंघनिहाय आकडेवारी

53.71 percent voting in Maharashtra; See Constituency wise statistics

 

 

 

 

देशभरातील ८९ मतदारसंघात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. या सर्व मतदारसंघांमध्ये मतदानाची वेळ संपेपर्यंत अर्थात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सरासरी 64.70 टक्के मतदान झालं.

 

 

 

 

तर यांपैकी महाराष्ट्रात आठ मतदारसंघात 53.71 टक्के मतदान झालं. यामध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक ५६.६६ टक्के मतदानाची नोंद झाली. निवडणूक आयागानं ही आकडेवारी जाहीर केली आहे.

 

 

 

देशातील १३ राज्यांमध्ये एकूण ८९ मतदारसंघांत दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी २६ एप्रिल रोजी पार पडलं. यासाठी १६ कोटी मतदार पात्र होते,

 

 

 

पण त्यांपैकी सुमारे ९ कोटी मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ९ मतदारसंघ हे अनुसुचित जातीसाठी तर ७ मतदारसंघ अनुसुचित जमातीसाठी राखीव होते.

 

 

 

 

यामध्ये केरळमधील सर्व २० मतदारसंघातील मतदान पूर्ण झालं आहे. तर महाराष्ट्रातील १३ मतदारसंघातील मतदान संपलं. त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यात आसाममधील ५,

 

 

 

बिहारमधील ५, छत्तीसगडमधील ३, कर्नाटकातील १४, मध्यप्रदेशातील ७, महाराष्ट्रात ८, मणिपूरमध्ये १, राजस्थानात १३, त्रिपुरात १, उत्तर प्रदेशात ८, पश्चिम बंगालमध्ये ३ आणि जम्मू व काश्मीर या राज्यात १ मतदारसंघात आज मतदान पार पडलं.

 

 

 

दुसऱ्या टप्प्यात आज झालेल्या मतदानामुळं प्रकाश आंबेडकर (अकोला), रवी राणा (अमरावती), रविकांत तुपकर (बुलडाणा), रामदास तडस (वर्धा)

 

 

 

यांच्यासह देशभरात ओम बिर्ला, राहुल गांधी, हेमा मालिनी, अरुण गोविल, एच. डी. कुमारस्वामी, शशी थरूर, भूपेश बघेल, के. सी. वेणुगोपाल, दानिश अली या महत्वाच्या उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये कैद झालं आहे.

 

 

 

महाराष्ट्रातील आठ मतदारसंघात इतके टक्के झालं मतदान

वर्धा – ५६.६६ टक्के

वाशिम-यवतमाळ – ५४.०४ टक्के

 

 

 

अमरावती – ५४.५० टक्के

अकोला – ५२.४९ टक्के

 

 

 

 

बुलडाणा – ५२.८८ टक्के

हिंगोली – ५२.०२ टक्के

 

 

 

परभणी – ५३.७९ टक्के

नांदेड – ५३.५३ टक्के

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *