शरद पवारांवरील टीका भोवली ;प्राध्यापकाला काळे फासले

Criticism of Sharad Pawar came; the professor was blacked out

 

 

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल प्रा. नामदेवराव जाधव हे सातत्याने वादग्रस्त विधान करत आहेत. याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांनी त्यांच्या तोंडाला काळं फासलं आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन महाविद्यालय येथे नामदेव जाधव यांच्या कार्यक्रमात घुसून त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला होता.

 

 

पण भांडारकर प्राच्यविद्या संशोधन महाविद्यालयामध्ये कोणतीही अनुचित घटना होता कामा नये.त्या पार्श्वभूमीवर नामदेवराव जाधव यांचा कार्यक्रम रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर केले होते.

 

 

त्याच दरम्यान नामदेवराव जाधव यांना नवी पेठेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चेहर्‍याला काळे फासून चोप दिल्याची घटना घडली.

 

 

नामदेवराव जाधव हे पत्रकार भवन येथे कार्यक्रम रद्द झाल्याबद्दल माहिती देत असताना शरद पवार गटाच्या काही कार्यकर्ते येऊन त्यांच्या तोंडाला अचानक काळं फासलं.

 

 

 

हा सगळा प्रकार माध्यमांच्या कॅमेऱ्या समोर घडला. यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत नामदेवराव जाधव यांना पूर्ण घेराव करत गाडीत बसून त्यांना तात्काळ घटनास्थळावरून रवाना केलं.

 

 

 

नामदेवराव जाधव यांना पोलिसांनी डेक्कन पोलीस ठाण्यात नेलं. तर, नामदेवराव जाधव यांनी या घटनेमागं रोहित पवारांचा हात असल्याचा आरोप केल्याची माहिती आहे.

 

 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे पुणे शहरप्रमुख प्रशांत जगताप यांनी नामदेवराव जाधव यांच्यावरील शाईफेक आणि तोंडाला काळं फासल्याच्या घटनेची जबाबदारी घेतली आहे.

 

 

 

महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्य सरकारमधील कुणीतरी उच्च पदस्थ पवार साहेबांचं नाव घेऊन मराठा आणि ओबीसी वाद पेटवण्याचा प्रयत्न करत आहे.

 

 

यासाठी नामदेवराव जाधव यांचा वापर केला जात आहे. विक्रोळी पोलीस स्टेशनला नामदेवराव जाधव यांच्यावर गुन्हा नोंद आहे. नामदेवराव जाधव शरद पवार यांच्या बद्दल पुरावा नसताना टीका करत होता,

 

असं प्रशांत जगताप म्हणाले. आज आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या तोंडाला काळं फासलं आहे त्याची जबाबदारी आम्ही घेत आहोत, असं जगताप म्हणाले

 

 

दरम्यान नामदेवराव जाधव यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार यांचा खोटा दाखला समोर आणला होता. तसेच त्यांनी शरद पवारांवर आरोप केले होते.

 

 

 

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुरावे देण्याची मागणी केली होती. तसेच, पुण्यातील त्यांचे कार्यक्रम उधळून लाववण्याचा इशारा दिला होता.

 

 

पुण्यातील नवी पेठ येथील पत्रकार भवन परिसरात राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांनी नामदेवराव जाधव यांच्या तोंडाला काळं फासलं. या प्रकरणानंतर जाधव यांनी फेसबुक लाइव्ह करत पुन्हा एकदा शरद पवार आणि रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

 

 

 

नामदेवराव जाधव यांनी फेसबुक लाइव्ह करत त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल प्रतिक्रिया दिली. पुण्यामध्ये आज आम्ही शिवजयंती अॅट सिंगापूर या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आलो होतो.

 

 

 

 

या संदर्भातील कार्यक्रम या लोकांनी उधळून लावला, त्याच्यानंतर पत्रकारांशी बोलताना हा हल्ला करण्यात आला. शिव फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेणाऱ्यांनी हा हल्ला केला.

 

 

शिवाजी महाराजांचे विचार जगभर जाऊ नयेत म्हणून हा हल्ला करण्यात आला आहे, असं नामदेवराव जाधव म्हणाले. हा एक प्रकारे लोकशाहीवरचा हल्ला आहे, असं नामदेवराव जाधव म्हणाले.

 

 

हा हल्ला लोकशाहीवरचा आहे, संबंधित लोकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करतो. कायदा व सुव्यवस्थेला चॅलेंज करण्याचा प्रयत्न आहे. हा पाच कोटी मराठ्यांवरचा हल्ला आहे, असं नामदेवराव जाधव म्हणाले.

 

 

 

मी पोलीस आयुक्त कार्यालयात जाणार आहे. कायदेशीर कारवाई करणार असून कार्यकर्त्यांना जबाबदार धरणार नसून पहिलं नाव शरद पवार आणि दुसरं नाव रोहित पवार यांचं असेल. या दोघांची खासदारकी आणि आमदारकी घालवण्यासाठी प्रचंड मोठं पाऊल उचलणार असल्याचं नामदेवराव जाधव म्हणाले.

 

 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी नामदेवराव जाधव यांच्यावरील शाईफेकीची जबाबदारी स्वीकारत असल्याचं म्हटलं. पुरावे न देता जाधव आरोप करत होते, असं जगताप म्हणाले.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *