सात एक्झिट पोल; कोणत्या पक्षाला किती जागा
seven exit polls; How many seats to which party?
गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून काढणाऱ्या विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया बुधवारी संपन्न झाली.
विधानसभा निवडणुकीसाठी यंदा राज्यभरात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 58.22 टक्के मतदान झाले. ही मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर आता विविध संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे निकाल जाहीर झाले आहेत.
यामधून यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार, याबद्दल संकेत मिळत आहेत
राज्यातील अन्य एक्झिट पोल्सचे निकाल खालीलप्रमाणे
1. इलेक्टोरल एज Exit Poll 2024भाजप-78,
काँग्रेस-60,
शरद पवार गट-46,
ठाकरे गट-44,
शिंदे गट-26,
अजित पवार गट-14,
इतर-20
2. पोल डायरी Exit Poll 2024
महायुती – 122-186
भाजप – 77-108
शिवसेना (शिंदे गट) – 27-50
राष्ट्रवादी (अजित पवार गट) – 18-28
महाविकास आघाडी – 69-121
काँग्रेस – 28-47
शिवसेना (ठाकरे गट) – 16-35
राष्ट्रवादी (शरद पवार गट) – 25-39
इतर – 12-29
3. चाणक्य एक्झिट पोल Exit Poll 2024महायुती 152 ते 160 जागा
भाजप-90
शिंदे गट- 48
अजित पवार गट-22
महाविकास आघाडी 130 ते 138 जागाकाँग्रेस-63
ठाकरे गट-35
शरद पवार गट-40इतर- 6 ते 8
MATRIZE Exit Poll 2024
महायुती 150-170
मविआ 110-130
इतर 8-10
REPUBLIC Exit Poll 2024
महायुती 137-157
मविआ 126-146
अन्य 2-8
News 24 P-MARQ Exit Poll 2024
महायुती 137-157
मविआ 126-146
इतर 2-8
चाणक्य एक्झिट पोलच्या अंदाजानुसार यंदाच्या निवडणुकीत महायुतीची सरशी होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत महायुतीला 152 ते 160 जागा मिळण्याची शक्यता आहे.
तर महाविकास आघाडीला 130 ते 138 जागांवर विजय मिळेल. तर अपक्षांना 6 ते 8 जागांवर विजय मिळेल, असा अंदाज चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे.
चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. भाजपला 90 जागा मिळतील, असा अंदाज आहे.
तर शिंदे गटाला 48 जागा आणि अजित पवार गटाला 22 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे. तर महायुतीसोबत असलेल्या सहयोगी उमेदवारांना 2 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेस 63 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरेल. या निवडणुकीत ठाकरे गटाला 35 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळू शकतो.
तर 40 जागांवर शरद पवार गटाचे उमेदवार विजयी ठरतील. तर या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी, एमआयएम आणि तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांना मिळून 6 ते 8 जागांवर विजय मिळण्याची अंदाज चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आली आहे.