शरद पवार गटाच्या स्टार प्रचारकावर गुन्हा दाखल
A case has been registered against the star campaigner of Sharad Pawar group
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे दोन टप्पे पार पडलेत. इतर उर्वरित टप्प्यांसाठी राजकीय पक्षाकडून जोरदार प्रचार केला जात आहे.
याच दरम्यान शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षाला मोठा धक्का बसलाय. स्टार प्रचारक असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हिंगणघाट पोलिसांत गुन्हा दाखल झालाय. पोलिसांनी शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल केला.
आदर्श आचारसंहितेच उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. अनिल देशमुख हे शरद पवार गटाचे स्टार प्रचारक आहेत.
स्टार प्रचारक किंवा बाहेर जिल्ह्यातील नेत्यांना मतदारसंघातून ४८ तास आधी जाण्याचे संकेत असतानाही अनिल देशमुख यांनी शुक्रवारी
वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या हिंगणघाट येथे भेट दिली. दुपारी साडेचार ते पावणे पाच दरम्यान देशमुख यांनी हिंगणघाटच्या नंदोरी चौकातील नागरिकांची भेट घेतली होती.
अनिल देशमुख हे नात्याने महाविकास आघाडीच्या पवार गटाचे उमेदवार अमर काळे यांचे सख्खे मामा आहेत. अमर काळे यांच्या प्रचाराची जबाबदारी अनिल देशमुख यांच्यावर आहे.
शुक्रवारी संध्याकाळी हिंगणघाट येथे जात तेथील कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. अनिल देशमुख हिंगणघाट येथे आले असल्याची माहिती आचारसंहिता प्रमुखांना मिळाली यावरून पथकाने जाऊन पाहणी केली.
यादरम्यान बंदी असतांनाही स्टार प्रचारक मतदारसंघात असल्याने आचरसंहितेचं उल्लंघन झाल्याचं सांगितलं जात आहे. हिंगणघाटचे विस्तार अधिकारी सुभाष टाकळे यांनी आचारसंहितेचं
उल्लंघन केल्याप्रकरणी हिंगणघाट पोलिसात तक्रार केली. तक्रारीनंतर पोलिसांनी अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. आदर्श आचारसहितेचे भांदवि 1860 अन्वये कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
वर्धा लोकसभा मतदारसंघाची ओळख आता भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला अशीच केली जाते. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत इथून
भाजपा उमेदवार रामदास तडस हे प्रचंड मताधिक्याने निवडून आले होते. त्यामुळे महाविकास आघाडीने अमर काळे यांच्या प्रचारसाठी कंबर कसलीय.