एकनाथ शिंदे यांना काय झाला आजार ?; डॉक्टरांनी दिली सविस्तर माहिती

What happened to Eknath Shinde?; Doctor gave detailed information

 

 

 

राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री यांची प्रकृती बिघडली असून त्यांना ताप, सर्दी आणि घशाचा संसर्ग झाल्याची माहिती डॉ. आर. एम. पार्टे यांनी दिली. आत डॉक्टरांनी माध्यमांशी संवाद साधून एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली.

महायुतीला राज्यात बहुमत मिळाल्यानंतरही सत्ता स्थापनेचा तिढा निर्माण झाला होता. मुंबईत सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. दिल्ली येथील बैठकीनंतर काल (२९ नोव्हेंबर) मुंबईत महायुतीची पुढील बैठक होणार होती.

 

मात्र ही बैठक टाळून शिवसेना नेते व काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल सायंकाळी दोन दिवसांच्या मुक्कामासाठी साताऱ्यातील आपल्या दरे गावी पोहोचले.

 

या वेळी माध्यम प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी केवळ मी विश्रांतीसाठी आलो आहे, नंतर बोलतो असे सांगून संवाद टाळला होता.

 

नेहमी गावी आल्यावर पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधणारे शिंदे काही न बोलल्याने त्याची सर्वत्र चर्चा सुरू होती. दरम्यान,

 

प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते गावी गेल्याचं आता समोर आलं आहे. यासंदर्भात त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. आर. एम. पार्टे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

 

“एकनाथ शिंदे यांना ताप येतोय, सर्दी आहे, घशाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर आता उपचार चालू केले आहेत. सलाईन लावली आहे. आयव्ही लावला आहे. त्यांना एक दोन दिवसांत बरं वाटले याची खात्री आहे”,

 

असं डॉ. आर. एम. पार्टे म्हणाले. ते पुढे म्हणाले, “कालपासून त्यांची प्रकृती चांगली नव्हती. आता प्रकृती चांगली आहे. आता गप्पा मारत होते. उद्या ते मुंबईला जाणार आहेत.”

 

काळजीवाहू मुख्यमंत्री दरे गावी पोहोचल्याचे कळताच आजूबाजूच्या जिल्हा आणि गावातील अनेक कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी दरे गावात पोहोचले. परंतु, एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट नाकारली. वैद्यकीय उपचार सुरू असल्याचं सांगत ही भेट नाकारण्यात आली आहे.

 

राज्यात सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून ५ डिसेंबर रोजी शपथविधी होणार आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी

 

यासंदर्भात माहिती दिली असून ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता आझाद मैदान येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *