मोदींचा महाराष्ट्र दौरा, दोन दिवसांत सहा सभा;
Modi's Maharashtra tour, six meetings in two days;
भाजप कुठलीही निवडणूक हलक्यात घेत नाही, हे वारंवार दिसून येत आहे. निवडणूक लागताच पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचे सर्वच नेते झाडून कामाला लागतात.
पंतप्रधान मोदी हे तर देशभर सभांचा धडकाच लावतात. त्यांची सभा होईल तेथील उमेदवार निवडून येण्याची शक्यता वाढते,
असे राजकीय वर्तुळात चर्चा असते. त्यामुळे देशातील महायुतीच्या उमेदवारांकडून मागणी असते. याचाच प्रत्यय राज्यातही येत आहे.
लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा पार पडला असून तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीकडे राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा दौरे होत आहेत.
येत्या दोन दिवसांत पंतप्रधान मोदींच्या तब्बल सहा सभा होणार आहेत. या सभांत ते काय म्हणातात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 29 आणि 30 एप्रिल या दोन दिवसांमध्ये राज्यात सहा सभा होणार आहेत. त्यातील तीन सभा सोमवारी (ता. 29) तर मंगळवार (ता. 30) तीन सभा होतील.
29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता सोलापूर शहरात पहिली सभा होणार आहे. त्यानतंर कराडमध्ये दुपारी एक वाजता दुसरी सभा होईल. तर संध्याकाळी सहा वाजता पुण्यामध्ये तिसरी सभा होणार आहे.
यानंतर पंतप्रधान मोदी पुण्यातील राजभवन येथे मुक्कामी थांबणार आहेत. दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी 11 वाजता माळशिरस येथे पहिली सभा होणार आहे.
त्यानतंर लातूरमध्ये दुपारी एक वाजता सभा होणार आहे. त्यानंतर मोदींची राज्यातील शेवटची सभा धाराशिव येथे चार वाजता होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध ठिकाणच्या सभांतून काँग्रेसवर सडकून टीका करतात. गेल्या दोन टप्प्यातील निवडणुकीत मोदींच्या भाषणांनी देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे.
मालमत्ता, मंगळसूत्र, राम मंदिर आदी मुद्द्यांवर पंतप्रधान मोदींनी सभा गाजवल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता होणाऱ्या राज्यातील सभांत काय बोलतात, याची उत्सुकता लागली आहे.