महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा;पाहा नवीन निवडणूक सर्व्हे

How many seats for which party in Maharashtra; see new election survey

 

 

 

 

लोकसभा निवडणुकीचं घोडामैदान जवळ आलं आहे. कधीही निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकतो अशी स्थिती आहे. अशात एका ओपिनियन पोलच्या अंदाजानुसार

 

 

 

 

महाराष्ट्रात महायुतीला म्हणजेच भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) या सगळ्या पक्षांना मिळून ४१ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

 

 

तर दुसरीकडे महाविकास आघाडीला महाराष्ट्रात सात जागा मिळतील असा अंदाज आहे. News 18 च्या मेगा ओपिनियन पोलने हा अंदाज वर्तवला आहे.

 

 

 

या पोलच्या सर्व्हेनुसार टक्केवारी पाहिली तर ४८ टक्के मतं ही महायुतीला तर ४३ टक्के मतं महाविकास आघाडीला पडू शकतात. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत.

 

 

 

उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० जागा आहेत. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक जागा असलेलं राज्य आहे. ओपनियन पोलसाठी जो सर्व्हे करण्यात आला तो १२ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीतला आहे.

 

 

 

 

 

भारतभरात हा सर्व्हे करण्यात आला. महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष एकत्रितपणे लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. त्यामुळे याचा फायदा देशात एनडीएला होणार हेच हा ओपिनियन पोल सांगतो आहे.

 

 

 

 

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना यांची युती होती. त्यावेळी शिवसेनेचं विभाजन झालेलं नव्हतं. त्यावेळी २३ जागा शिवसेनेने लढवल्या होत्या तर २५ जागा भाजपाने लढवल्या होत्या.

 

 

 

भाजपाने २५ पैकी २३ जागा जिंकल्या होत्या तर शिवसेनेने २३ पैकी १८ जागा जिंकल्या होत्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसने १९ जागा लढवल्या होत्या त्यापैकी ४ जिंकल्या होत्या.

 

 

 

 

मात्र २०१९ आणि २०२४ या दोन लोकसभा निवडणुकांची राजकीय परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. सध्याच्या घडीला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना महाराष्ट्रात रंगणार आहे. मात्र महाविकास आघाडीला अवघ्या सात जागा मिळतील असा अंदाज व्यक्त होतो आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *