एकनाथ शिंदे आणि अजित पवार गट भाजपमध्ये जाणार; शिवसेना नेत्याचा खळबळजनक दावा

Eknath Shinde and Ajit Pawar group to join BJP; Sensational claim of Shiv Sena leader

 

 

 

 

एकनाथ शिंदे हिंदूहृदयसम्राट आहेत का? यावर मी बोलण्यापेक्षा त्यांनी स्वत:च सांगावं. ते ज्या गटात सध्या आहेत तो गट काही दिवसांनी राहिल की नाही असा प्रश्न आहे.

 

 

 

कारण काही दिवसांनी हा गट भाजपमध्ये विलिन होणार आहे. भविष्यात अजित पवार आणि एकनाथ शिंदे गट भाजपमध्ये जाणार आहे,

 

 

असा दावा खासदार संजय राऊत यांनी केलाय. राऊतांच्या या दाव्यानंतर राजकीय वतृळात एकच खळबळ उडाली आहे.

 

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २३ नोव्हेंबर रोजी राजस्थानमध्ये भाजपच्या प्रचारासाठी गेले होते. येथे दौऱ्यावेळी बॅनरवर एकनाथ शिंदे यांचा उल्लेख हिंदूहृदयसम्राट असा करण्यात आलाय.

 

 

 

यावरून संजय राऊतांनी शिंदे गटावर टिकास्त्र सोडलंय. त्यांनी स्वत:ला कितीही पदव्या लावून घेतल्या तरी त्याचा फार काही फरक पडत नाही.

 

 

 

महाराष्ट्रात असं करण्याची कुणाचीही हिंमत नसते. तसं केल्यास लोक जोड्याने मारतील. साल २०१४ नंतर भारतीय जनता पक्षाने असे अनेक नेते निर्माण केलेत, असं संजय राऊत म्हणाले.

 

 

 

जर एकनाथ शिंदे खरंच हिंदूहृदयसम्राट असतील तर त्यांनी असं काय महान कार्य केलंय ते पहावं लागेल. आम्ही हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं काम पाहिलंय.

 

 

 

त्यांच्यासोबत काम केलंय. त्यांनी कधीच सत्तेसाठी तडजोड केली नाही, अशा शब्दांत संजय राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली आहे.

 

 

 

गेल्या ४ दिवसांत २ कॅप्टनसह ४ जवानांचं बलिदान दिलं. यावर गृहमंत्री आणि संरक्षणमंत्र्यांकडून कोणत्याही प्रकारे संवेदना व्यक्त करण्यात आली नाही.

 

 

 

केंद्र सरकार ५ राज्यांच्या निवडणुकीत व्यस्त आहे. त्यांना काँग्रेस मुक्त भारत आणि शिवसेना मुक्त माहाराष्ट्र करायचा होता. मात्र हे काही झालं नाही, अशा शब्दांत राऊतांनी केंद्र सरकारवर देखील निशाणा साधलाय.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *