ट्रॅक्टर विहिरीत कोसळून हिंगोली जिल्ह्यातील ७ महिलांचा मृत्यू

7 women die in Hingoli district after tractor falls into well

 

 

 

नांदेडमध्ये महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळून ७ महिलांचा मृत्यू झाला. मृत पावलेल्या सगळ्या जणी हिंगोलीचे रहिवासी आहेत. शेतीच्या कामासाठी त्या नांदेडमध्ये आल्या होत्या.

 

नांदेडमध्ये घडलेल्या घटनेमुळे हिंगोलीतल्या वसमत तालुक्यातील गुंज गावावर शोककळा पसरली. नांदेडमध्ये ट्रॅक्टर अपघातात

 

मरण पावलेल्या ७ महिला गुंज गावच्या रहिवासी होत्या. या दुर्घटनेदरम्यान प्रत्यक्षदर्शी ईरबाजी सरोदे यांनी २ महिलांना जीवदान दिलं. पण याच दुर्घटनेत त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला.

 

हिंगोलीच्या वसमत तालुक्यामधील गुंज गावातील शेतमजूर महिला भुईमूग काढणीसाठी नांदेडमधील आलेगावात ट्रॅक्टरनं जात होत्या. त्यांचा ट्रॅक्टर अचानक पाण्यानं भरलेल्या विहिरीत कोसळला.

 

महिलांनी मदतीसाठी आक्रोश सुरु झाला. त्यांचा आवाज तिथे काही अंतरावर असलेले ईरबाजी सरोदे मदतीला धावले. त्यांची पत्नी त्याच ट्रॅक्टरमध्ये होती.

 

ईरबाजी यांनी दोन महिलांना विहिरीबाहेर काढून जीवदान दिलं. पण सरोदे यांच्या पत्नीचा मात्र दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातावेळचा घटनाक्रम सरोदे यांनी कथन केला.

‘मी दोन महिलांना वाचवलं. पण माझी पत्नी विहिरीत आहे. सकाळी मी गावाहून आलो होतो. ट्रॅक्टर पाठीमागून आला. मी त्यावेळी वर होतो. आरडाओरडा झाल्यानंतर मी विहिरीजवळ आलो.

 

विहिरीत पडलेल्या ट्रॅक्टरमध्ये १० ते १२ महिला होत्या. ट्रॅक्टर विहिरीत कसा पडला ते मला माहीत नाही. महिलांचा आरडाओरडा ऐकून मी विहिरीजवळ धावलो. मी तिघींना वर काढलं. ट्रॅक्टरचा चालक पळून गेला होता,’ असा घटनाक्रम सरोदेंनी सांगितला.

 

 

ईरबाजी सरोदे यांच्या पत्नीचा ट्रॅक्टर विहिरीत पडून मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूचं दु:ख बाजूला सारुन त्यांनी प्रसंगावधान राखलं आणि तिघींना बाहेर काढलं. ईरबाजी यांच्या दृष्टीस पडलेल्या महिलांना त्यांनी जीवदान दिलं.

 

पण दुर्दैवानं स्वत:च्या पत्नीचा जीव त्यांना वाचवता आला नाही. ट्रॅक्टर पलटी झाल्यानंतर ईरबाजी यांच्या पत्नी वाहनाच्या खाली गेल्या.

 

त्यामुळे त्यांचा जीव वाचवणं ईरबाजी यांना शक्य झालं नाही. सगळ्या महिला दगडू शिंदे यांच्या शेतात कामाला आल्या होत्या. या दुर्दैवी घटनेमुळे हिंगोलीवर शोककळा पसरली आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *