शपथविधीचं आमंत्रण नाही,राज ठाकरे नाराज
No invitation to oath ceremony, Raj Thackeray is upset

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर रविवारी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पीएम मोदी यांच्यासह 72 केंद्रीय
आणि राज्यमंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्याला देशविदेशातील मान्यवरांसह प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांसह विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र, राज्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेला या सोहळ्यासाठी निमंत्रित न केल्याने मनसेने उघड नाराजी व्यक्त केली.
त्यानंतर आता शिवसेना नेत्यांकडून राज ठाकरेंच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. याबद्दल मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी माहिती दिली.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सकाळपासून महायुतीतील नेते गाठीभेटी घेत आहेत. आरोग्यमंत्री तानाजी सावंत, शिवाजी नलावडे हे भेटले असून पाठिंबा मागितला आहे.
आम्ही महायुतीसोबत आहेत, त्यामुळे पाठींबा हा आहे. इलेक्शन कमिशन म्हणून अध्यक्ष निवडायचे असतात. ती बैठक उद्या माटुंगाला आहे. रंग शारदाला अनेक पदाधिकारी उपस्थित असणार आहेत, अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावकर यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला निमंत्रण का नाही दिलं? याबद्दल माहित नाही. ह्याविषयी राज ठाकरे बोलतील. सुधीर मुनगंटीवार यांचा फोन आला होता.
त्यांनी माझ्याकडून माहिती घेतली, असल्याचे नांदगावकर यांनी सांगितले. दरम्यान, यावर आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे यांना निमंत्रण नव्हतं असं बाळा नांदगावकर म्हणाले. वरिष्ठांच्या कानावर हे टाकलं जाईल, घाईगडबडीत राहिलं असेल. काहींना निमंत्रण जात नाही, मात्र याची नोंद केंद्रीय पक्षाने घेतली पाहिजे’ असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.