मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली सात नेत्यांची पक्षातूल हकालपट्टी
Chief Minister Eknath Shinde expelled seven party leaders

विधानसभा निवडणुकांची प्रचाराची रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यात आहे. पक्षाने अधिकृत उमेदवारांची घोषणा केल्यावरही अनेक मतदारसंघांमध्ये अनेक नेत्यांनी बंडखोरी केल्याचं पाहायला मिळायलं.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आदेश पक्षांनी नेत्यांना दिले होते. परंतु तरीही काहींनी अर्ज मागे न घेता निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर कारवाई करत पक्षातूल हकालपट्टी केली होती, आता बंडखोर नेत्यांना मदत करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे निलंबण करण्यात आले नाही.
बेलापूर मतदारसंघातील शिवसेनेचे शिंदे गटातील सात पदाधिकाऱ्यांना दणका देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे निलंबन केलं आहे. या विधानसभा मतदारसंघातील बंडखोर उमेदवार विजयी नाहटा
यांना मदत करणाऱ्या पदाधिकाऱ्यांविरोधात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी नुकत्याच झालेल्या एका प्रचार सभेत बंडखोर उमेदवारांना उमेदवार साथ देऊ नका असे बजावले होते.
मात्र त्यानंतरही हा प्रकार सुरू होता अखेर शिवसेनेच्या शीर्षस्थ नेतृत्वाच्या वरिष्ठ पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर या सगळ्याची गंभीर तक्रार घेत त्या सात पदाधिकाऱ्यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
महायुतीमधील भाजपनंतर आता शिवसेनेचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनही पक्षविरोधी काम कराल तर खबरदार असाच अप्रत्यक्षरीत्या संदेश देण्यात आला आहे.
शिंदेंच्या शिवसेना तर्फे पक्ष विरोधी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये तीन उपजिल्हाप्रमुख, दोन विभाग प्रमुख,
एक उपविभाग प्रमुख आणि एक सहसंपर्क प्रमुखाचे या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. बेलापूर विधानसभा क्षेत्रात भाजपा महायुतीच्या उमेदवार
मंदा म्हात्रे यांच्या ऐवजी अपक्ष उमेदवार विजय नाहटा यांचा प्रचार करत असल्याने ही मोठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
शिवसेना सचिव संजय मोरे यांनी पत्रक काढत ही माहिती दिली आहे. मिलिंद सूर्यराव-उपजिल्हाप्रमुख सानपाडा, संजय भोसले- उपजिल्हाप्रमुख नेरुळ,दिलीप घोडेकर- उपजिल्हाप्रमुख नेरूळ,
अतिश परत -विभागप्रमुख तुर्भे, कृष्णा सावंत- वाशी सहसंपर्क प्रमुख, देवेंद्र चोरगे- उपविभाग प्रमुख सानपाडा, संजय वासकर-विभागप्रमुख सानपाडा या पदाधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश असेल याची माहिती शिवसेना सचिव संजय मोरे यांनी दिली आहे.