चव्हाणांनंतर आणखीन एक काँग्रेस नेत्याचा राजीनामा
Another Congress leader resigns after Chavan

अशोक चव्हाण यांच्यानंतर आता काँग्रेसच्या आखणी एका माजी आमदारानं देखील काँग्रेसला रामराम केला आहे. या नेत्यानं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडं आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. सकाळपासूनच काँग्रेसमध्ये मोठा भूकंप होणार असल्याची चर्चा सुरु होती.
अशोक चव्हाण यांनी सकाळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली आणि आपल्या आमदारकीचा राजीनामा त्यांच्याकडं सोपवला.
त्यांच्या आणि नार्वेकरांच्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. यानंतर चव्हाणांसोबत इतरही डझनभर आमदार काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या.
यांपैकी विधानपरिषदेचे माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांनी देखील आपल्या नांदेड शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदाचा तसेच काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
चव्हाण म्हणाले, “मला कुठलीही पक्षांतर्गत जाहीर वाच्यता करायची नाही. कुणाचाही उणीदुणी काढायची नाही. मी काँग्रेसमध्ये अनेक वर्षे काम केलं आहे. आता वेगळ्या पर्यायाचा विचार करायला हवा.
म्हणून मी हा निर्णय घेतला आहे. मी उद्याप इतर कुठल्याही पक्षात सामिल होण्याचा निर्णय घेतलेला नाही. प्रत्येक गोष्टीचं कारण सांगितलं जाऊ शकत नाही. मी काल संध्याकाळपर्यंत पक्षाच्या बैठकीत सहभागी होतो”