भुजबळ-जरांगे पाटील यांच्यात पुन्हा जुंपली

Bhujbal-Jarange Patil clashed again

 

 

 

 

मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “ज्यावेळी अंतरवाली सराटीत दगडफेक झाली.

 

त्यानंतर जो लाठीचार्ज झाला. त्यावेळी मनोज जरांगे तिथून निघून गेला होता. रात्री दोन वाजता राष्ट्रवादीचे दोन आमदार तिथे गेले.

 

एक स्थानिक आमदार आणि रोहित पवार तेथे गेले. या दोघांनी परत तिथे आणून त्याला बसवला”, असा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला होता. आता मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

 

छगन भुजबळ यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना जरांगे म्हणाले, आलाच का ते कुठे गेलता काय माहित, तो महात्मा पाहिजे होता एखादा,चमत्कारी बाबा आहे तो. छगन भुजबळांना वेड लागलय.

 

त्यांना आरोप करण्यापलिकडे काय करता येत नाही. आरोप करतोय तर सिद्ध करा. देवेंद्र फडणवीसांची शक्ती तुमच्यामागे आहे. त्याच आम्ही आता काही मनावर घेत नाहीत.

 

छगन भुजबळला गोरगरिब मराठ्यांमध्ये आणि ओबीसींमध्ये दंगली घडवायच्या आहेत. सध्या देवेंद्र फडणवीसचे आमदार म्हणत आहेत,

 

सध्या मणिपूरसारखी परिस्थिती होणार आहे. यांना शिक्कामोर्तब केलाय, दंगली घडवून निवडणुका लढवायच्या आहेत.

 

पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, छगन भुजबळ महापापी माणूस आहे. गोरगरिब मराठ्यांमध्ये आणि ओबीसीमध्ये याला दंगली घडवायच्या आहेत.

 

आम्ही सर्वजण एकत्र आहोत. आमच्या आंदोलनापुढे आंदोलन आणून बसवणार आहेत. हे महापाप या वयात तो करायला लागलाय. आपण किती ज्येष्ठ आहोत,

 

पक्षात किती मोठे आहोत. आपण विचारांची मांडणी किती पुरोगामीपणाने केली पाहिजे. हे त्याच्या लक्षात नाही, त्याला फक्त दंगली घडवायच्या आहेत.

 

सरकार तुझ्याकडे तू चौकशी कर. मी असं म्हणालो तर तूच माघारी आणलं आणि मला बसवलं, असा सवालही मनोज जरांगे पाटील यांनी केलाय.

 

ज्या वेळेला अंतरवाली सराटीमध्ये दगडफेक झाली लाठीमार झाला त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे जरांगे तिथून निघून गेला. त्यावेळी राष्ट्रवादीचे दोन आमदारांनी त्याला तिथे परत आणून बसवलं.

 

पवार साहेबांना तिथे बोलावलं पवार साहेब गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले. खरी माहिती जी आहे त्या दोघांना कल्पना नव्हती.

 

पवार साहेबांना पण आणि उद्धव ठाकरेंना पण इथे पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. महिला पोलीस कर्मचारी दवाखान्यात दाखल झाले. हे दोन्ही नेते गेल्यामुळे एकच बाजू जनतेच्या पुढे आली त्याचा फायदा जरांगेंना मिळाला.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *