महिला पोलीस अधिकाऱ्याला पेट्रोलने जाळून जीवे मारण्याचा प्रयत्न

An attempt was made to kill a woman police officer by burning her with petrol

 

 

 

 

विद्येचं माहेरघर असलेल्या सुसंस्कृत पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न आता संपूर्ण राज्याला पडलाय. पुण्यात घडलेल्या एका घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला आहे.

 

 

 

पुण्यात महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

 

 

 

 

ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई सुरू असताना हा धक्कादायक प्रकार घडल्याची धक्कादायक माहिती सध्या समोर येत आहे. दरम्यान, पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

 

 

 

पुण्यातील फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोर रात्री 8 वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. या घटनेनं संपूर्ण पुणेच नव्हेतर अवघा महाराष्ट्र पुरता हादरून गेला आहे.

 

 

 

 

फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोर काल (शुक्रवारी) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई सुरू होती.

 

 

 

 

ही कारवाई सुरू असताना महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न एका वाहनचालकाना केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

 

 

 

 

घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेतलं. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळल्याची माहिती मिळत आहे.

 

 

 

आरोपी संजय फकिरा साळवे (राहणार : पिंपरी चिंचवड (मूळगाव- जालना)) याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपीनं दारू पिऊन हे धक्कादायक कृत्य केलं असल्याची माहिती समोर आली आहे.

 

 

 

पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटकही करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

 

 

 

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात ज्या काही घटना घडत आहेत. त्या घटनाच्यां पार्श्वभूमीवर पोलिसांना वरिष्ठांकडून रात्रीच्या वेळी बंदोबस्त लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

 

 

तसेच, रात्रीच्या वेळी जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांना थांबून त्यांची तपासणी देखील करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आलेल्या आहेत.

 

 

 

अशीच नाकाबंदी पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोर सुरू होती. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यानं एका गाडीला थांबवलं, गाडीची तपासणी केली.

 

 

त्यावेळी ड्रायवर मद्यधुंद अवस्थेत असल्याचं आढळून आलं. त्यानंतर ड्रायव्हरनं महिला पोलिसावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *