रेशन दुकानदार उद्यापासून बेमुदत संपावर

Ration shopkeepers on indefinite strike from tomorrow ​

 

 

 

 

विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशपातळीवरील ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डिलर्स फेडरेशनने पुकारलेल्या बेमुदत बंदमध्ये अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार

 

 

व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघाने उडी घेतली आहे. त्यामुळे येत्या एक जानेवारीपासून पुण्यासह महाराष्ट्रातील रेशनदुकानदार बेमुदत संपावर जाणार आहेत.

 

 

रेशन दुकानदारांना मार्जिन इन्कम गॅरंटी ५० हजार करा, मार्जिन मनी ३०० रुपये करा, टू जी ऐवजी फोरजी मशीन द्या, कालबाह्य नियम बदला, आनंदाचा शिधा कायमस्वरुपी राबवून कांदा,

 

चणाडाळ, तूरडाळ, मूगडाळ या वस्तू रेशन दुकानात उपलब्ध करा यासारख्या मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.

 

त्यासाठी पुण्यासह महाराष्ट्रातील रेशन दुकानदार संपावर जाणार आहेत, असे पुणे शहर रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गणेश डांगी यांनी सांगितले.

 

 

राज्यात सुमारे ५३ हजार रास्त भाव दुकानदार आहेत. त्यांच्या प्रलंबित न्याय हक्क मागण्यांसंदर्भात केंद्र आणि राज्य सरकार उदासीन आहे. आंदोलन आणि मोर्चाची सरकारकडून दखल घेतली नाही.

 

 

 

महासंघाच्या निवेदनाची दखल घेत सरकारने सचिवांच्या अध्यक्षतेखाली हिवाळी अधिवेशन काळात नागपूरला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात केवळ आश्वासने देण्यात आली.

 

 

मात्र निर्णय झाला नाही. त्यामुळे महासंघाच्यावतीने नाईलाजास्तव ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशनने एक जानेवारीपासून पुकारलेल्या संपात सहभाग होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

 

 

या आंदोलनात राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी सहभागी होण्याचे आवाहन महासंघाकडून करण्यात आले आहे.

 

रेशन बंद आंदोलनामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपली दुकाने बंद ठेवावीत. या काळात दुकानदारांनी आपापल्या दुकानातील ई-पॉस मशीन कार्यान्वित करू नयेत.

 

 

तसेच कोणत्याही प्रकारे धान्याची उचल आणि वितरण करू नयेत, असे पुणे शहर रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गणेश डांगी यांनी सांगितले.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *