आमदार धस म्हणाले ,मुन्नी बोलत नाही, मुन्नीचे कपडे टराटरा फाटले

MLA Dhas said, Munni is not talking, Munni's clothes are torn to pieces

 

 

 

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर एकच खळबळ उडाली. याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत.

 

याप्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यातच आता संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, त्यांना न्याय मिळावा

 

यासाठी ठिकठिकाणी जनआक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. त्यातच आता आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा मुन्नी या शब्दाचा पुनरुच्चार केला आहे.

सुरेश धस यांनी नुकतंच ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेंवर आरोप केले. “जो आरोपी कमी वयाचा आहे, तो घाबरुन कुठेतरी बसला असावा.

 

बाकी आरोपी पकडले गेले आहेत. जो फरार आहे, तो पण पकडला जाईल. विष्णु चाटे पोलीस तपासात मदत करतो की नाही हे माहित नाही. वेळ पडली तर हे प्रकरण नार्को टेस्टपर्यंत जाईल, असे सुरेश धस म्हणाले.

 

काही महिलांना 25 ते 50 हजार पैसे मिळाले. अजित दादांच्या कोडांवळ्यामुळे निर्णय घेता येत नाही. धनजंय मुंडेंनी पदावर राहू नये. याचा तपासावर प्रभाव होईल.

 

काल मी एक प्रकरण सांगितले होते. अजित दादांना काही दिवसांनी काय संबंध हा धनंजय मुंडेंचा ते समजेल. आम्ही ठामपणे म्हणत नाही त्यांनी ही म्हणू नये, असेही सुरेश धस यांनी म्हटले.

 

त्यानंतर सुरेश धस यांनी मुन्नी या शब्दाचा पुनरुच्चार केला. ती मुन्नी आहे, तिला कळले आहे, ती महिला भगिणी नाही. ती मुन्नी राष्ट्रवादी मधलीच आहे. मुन्नीला आवाहन आहे की कुठेही येऊन बसावे.

 

मुन्नीसोबत आमचे चार पाच वेळा फोटो असतील. मुन्नी बोलत नाही, मुन्नीचे कपडे टरा टरा फाडले जातील. मुन्नी मला घाबरत आहे.

 

मुन्नीचे माझ्यावर फार प्रेम आहे. आपण मुन्नीची वाट पाहूयात. आमचे प्रेम 2017 पासूनचे आहे, असा खुलासा सुरेश धस यांनी केला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *