कोर्टात कोल्हापुरी चप्पल घालून येण्यास बंदी

Wearing Kolhapuri slippers in court is prohibited.

 

 

 

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आणि इंद्रजीत सावंत शिवीगाळ प्रकरणातील आरोपी प्रशांत कोरटकरची तीन दिवसांची पोलीस कोठडी आज संपली.

 

आरोपीला आज कोल्हापूर सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. सध्या कोर्टात सुनावणी सुरु आहे. खबरदारी म्हणून कोल्हापुरी चप्पल घालून कोर्टात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

 

कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय समोर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. कोल्हापुरी चप्पल घालून कोर्टात प्रवेश करण्यास बंदी आहे.

 

ज्यांच्या पायात कोल्हापुरी चप्पल आहे, त्यांना पोलिसांकडून गेटवरच थांबवलं जातय आणि कोल्हापुरी चप्पल काढून त्यानंतर आत पाठवलं जात आहे.

 

प्रशांत कोरटकरला तेलंगणमध्ये अटक करण्यात आली. कोल्हापुर येथील पोलीस स्टेशनमध्ये त्याला आणलं, त्यावेळी बाहेर मोठा जमाव जमला होता.

 

त्याला पहिल्यांदा कोल्हापूर सत्र न्यायालयात हजर केलं, त्यावेळी जमावातील अनेकांच्या हातात कोल्हापुरी चप्पल होती. कोल्हापुरी पायथान त्याच्या गालावर उमटवण्याची इच्छा अनेक शिवभक्तांनी व्यक्त केली होती.

 

तीन दिवसांपूर्वी त्याला कोल्हापूर सत्र न्यायालयाबाहेर आणत असताना कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. पण सर्तक असलेल्या पोलिसांनी लगेच संबंधिताला पकडलं होतं.

 

प्रशांत कोरटकरवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याचा आरोप आहे. त्याच्याबद्दल राज्यातील शिवभक्तांच्या तीव्र भावना आहेत.

 

त्याला धडा शिकवण्याची इच्छा आहे. त्याच्यावर कोर्टाच्या आवारात कोल्हापुरी चप्पलने हल्ला होण्याची भिती असल्याने कोर्टात कोल्हापुरी चप्पल घालून प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *