युतीत तणाव; मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राला भाजप आमदार भिडले

tension in alliances; BJP MLA clashed with Chief Minister's son ​

 

 

 

 

महायुती सरकारमध्ये एकत्र असतानाही भाजप आणि शिवसेना शिंदे गटामधल्या कुरबुरी सुरूच आहेत. विशेष म्हणजे कल्याण पूर्वेचे भाजप आमदार

 

 

गणपत गायकवाड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामधला कलगीतुरा काही थांबण्याचं नाव घेत नाहीये.

 

 

तीन राज्यांत भाजपला मिळालेल्या दणदणीत विजयानंतर आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण लोकसभेवर अगदी ठासून दावा सांगितला.

 

 

प्रत्युत्तरादाखल श्रीकांत शिंदे यांनी मनोरंजनासाठी विधानाकडे पाहावं, असा टोला लगावला. गणपत गायकवाड यांना हा टोला चांगलाच बोचला असून त्यांनी थेट ‘गद्दारी’पर्यंत विषय नेला.

 

 

 

राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यामुळे कल्याण पूर्वेत भाजप आमदार गणपत गायकवाड आणि पदाधिकारी यांनी एकमेकांना लाडू भरवत जल्लोष करत विजय उत्सव साजरा केला.

 

 

लोकसभा आणि राज्यातील निवडणुकीत भाजप पक्ष पुन्हा सत्तेत असेल, असं भाविक वर्तवताना कल्याण आणि भिवंडी लोकसभेत आमचे भाजपचे उमेदवार निवडून येतील,

 

 

 

असं श्रीकांत शिंदे यांना डिवचणारं विधानही त्यांनी केलं. त्यांच्या विधानामुळे भाजप कल्याण लोकसभेला आपला उमेदवार देणार का? अशी चर्चा पुन्हा नव्याने सुरू झाली.

 

 

 

कल्याण लोकसभेवर भाजप आमदारांनी दावा सांगितल्याने चिडलेल्या श्रीकांत शिंदे यांनी गायकवाड यांची विधाने मनोरंजन म्हणून घ्या, असं म्हणत जोरदार चिमटा काढला.

 

 

 

जोपर्यंत ते अशी वक्तव्य करणार नाही तोपर्यंत त्यांना प्रसिद्धी मिळणार नाही. म्हणून त्यांची वक्तव्ये मनोरंजन म्हणून घ्या, अशी टोलेबाजी त्यांनी केली. त्यांची टोलेबाजी गणपत गायकवाड यांना चांगलीच झोंबली. त्यांनी हे प्रकरण थेट ‘गद्दारी’पर्यंत नेले.

 

 

श्रीकांत शिंदे यांना उत्तर म्हणून भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी एक्स (ट्विट) केले. ज्यांना गद्दारी करून कमी वेळात अमाप पैसा आणि सत्तेचं बळ मिळाले आहे,

 

 

त्यांना त्यांच्या नजरेने सर्व जग विदूषक आहे असा भास होतो.. अशी बोचरी टीका त्यांनी केली. त्यामुळे सत्तेत एकत्र असलेल्या दोन्ही नेत्यांमध्ये कल्याण लोकसभेवरून पुन्हा एकदा कलगीतुरा रंगल्याचं चित्र दिसून येत आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *