एक्झिट पोल्स मध्ये मनोज जरांगेंचा प्रभाव नाही? मराठा मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने?

Manoj Jarang has no influence in exit polls? In whose favor do the Maratha voters vote?

 

 

 

यंदाची विधानसभा निवडणूक मराठा आंदोलनाभोवती केंद्रित राहिली. मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्याचा परिणाम महायुतीला लोकसभा निवडणुकीत दिसला.

 

मराठा फॅक्टरमुळे लोकसभेला मोठा फटकाही बसला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही हीच जादू दिसेल का असा प्रश्न होता. मतदानानंतर आलेल्या एक्झिट पलनुसार महायुतीला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे.

 

कारण, १० पैकी ६ एक्झिट पोल्सनुसार महायुती जिंकून येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मराठा फॅक्टर या निवडणुकीत कितीसा प्रभावी ठरला याबाबत साशंकता आहे.

 

इलेक्ट्रोल एज एक्झिट पोल काय सांगतो?
महायुती -११८ जागा
महाविकास आघाडी १५० जागा

 

पोल डायरी एक्झिट पोल
महायुती -१२२ ते १८६
महाविकास आघाडी- ६९ ते १२१

 

चाणक्य एक्झिट पोल
महायुती १५२ ते १६० जागा
महाविकास आघाडी -१३० ते १३८ जागा

 

मॅट्रिझचा एक्झिट पोल
महायुती १५० ते १७० जागा
महाविकास आघाडी – ११० ते १३० जागा

 

पी मार्क्यू एक्झिट पोल
महायुती-१३७ ते १५७ जागा
महाविकास आघाडी- १२६ ते १४६ जागा

 

रिपब्लिक एक्झिट पोल
महायुती- १३७ ते १५७ जागा
महाविकास आघाडी १२६ ते १४६ जागा

 

SAS एक्झिट पोल
महायुती – १२७ ते १३५ जागा
महाविकास आघाडी- १४७ ते १५५ जागा

 

पिपल्स पल्स एक्झिट पोल
महायुती १७५ ते १९५ जागा
महाविकास आघाडी-८५ ते ११२ जागा
इतर- ७ ते १२ जागा

 

भास्कर रिपोर्टर्स पोल
महायुती- १२५ ते १४० जागा
महाविकास आघाडी १३५ ते १५० जागा

 

लोकशाही महारुद्र
महायुती-१२८ ते १४२ जागा
महाविकास आघाडी- १२५ ते १४० जागा
इतर – १८ ते २३ जागा

 

असे हे दहा एक्झिट पोल ; आहेत. यापैकी सहा पोल्सनी महायुतीचं सरकार येईल असा अंदाज वर्तवला आहे. तर लोकशाही महारुद्रच्या पोलने राज्यात त्रिशंकू अवस्था असेल आणि अपक्ष किंवा बंडखोरांच्या हाती सत्तेच्या चाव्या असतील असा अंदाज वर्तवला आहे. प्रत्यक्षात काय होणार हे २३ तारखेला स्पष्ट होणार आहे.

 

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली. मागच्या वर्षी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे आरक्षणासाठी उपोषण करत असताना पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर जरांगे पाटील चर्चेत आले होते.

 

विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनंतर काही उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरले होते. मात्र, आदल्या रात्री जरांगे पाटील यांनी सांगितल्यानंतर अर्ज मागे घेण्यात आले.

 

 

आम्ही कोणत्याही उमेदवारांना पाठिंबा देणार नाही, असंही ते म्हणाले होते. परंतु, मराठा आरक्षणाचा विचार करून मतदान करा, असं आवाहन त्यांनी मराठा मतदारांना केलं होतं.

 

त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत मराठा मतदार मोठा प्रभाव पाडण्याची शक्यता होती. परंतु, एक्झिट पोल्सनुसार मराठा मतदारांचा फारसा प्रभाव पडलेला नसल्याचं दिसतंय. मात्र, हे चित्र २३ नोव्हेंबरलाच स्पष्ट होईल.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *