महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध;पहा कोणा-कोणाला काय मिळणार ?

Manifesto of Mahavikas Aghadi released; see who will get what?

 

 

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. पुढच्या काही दिवसांत राज्यात २८८ जागांसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून मतदारांना आश्वासनांची खैरात वाटली जात आहे.

 

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी भाजपाने त्यांचा जाहीरनामा प्रकाशित केला. त्यानंतर आता महाविकास आघाडीने त्यांचा जाहीरनामा प्रकाशित केला आहे. या जाहीरनाम्याला ‘महाराष्ट्रनामा’ असं नाव देण्यात आलं आहे.

 

मुंबईत आज महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या परिषदेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,

 

राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या ( शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे, खासदार संजय राऊत उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत मल्लिकार्जुन खरगे यांनी

 

महाविकास आघाडीच्या जाहीरनामात पहिल्या १०० दिवसांचा अजेंडा जाहीर केला. यावेळी बोलताना, आमच्या पाच हमी महाराष्ट्रातील सर्वांच्या कल्याणासाठी उपयुक्त ठरतील, असं मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

 

महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात नेमकं काय?
१) महालक्षी योजनानुसार महिलांना तीन हजार प्रतिमहिना देणार

२) महिलांसाठी बस प्रवास मोफत करणार

 

 

३) ६ गॅस सिलिंडर प्रत्येकी ५०० रुपयांत उपलब्ध करून देणार

४) महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायद्याची अंमलबजावणी करणार

 

 

५) महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या दिवसांमध्ये २ दिवसांची ऐच्छिक रजा देणार

६) जन्मलेल्या प्रत्येत मुलीच्या नावे ठरावीक रक्कम बॅंकेत ठेवणार, १८ वर्षांनंतर लाख रुपये देणार

 

७) सुशिक्षित बेरोजगारांना दरमहिना ४ हजार रुपयांपर्यंत भत्ता देणार

८) शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत कर्जमाफी देणार

 

९) नियामित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत सूट देणार

१० ) राज्य सरकारच्या अडीच लाख जागांची भरती प्रक्रिया सुरु कऱणार

 

११) एमपीएससीचे वेळापत्रक जाहीर करून ४५ दिवसांत निकाल जाहीर करणार

१२) महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना करणार, आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या वर नेणार

 

१३) संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना दीड हजारांऐवजी २ हजार देणार

१४) ३०० युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्यांचे १०० युनिटपर्यंतचे वीजबील माफ करणार

 

१५) सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार

१६) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार

 

१७) महायुती सरकारने पक्षपाती भूमिकेतून काढलेल्या अध्यादेशांचा फेरविचार करणार

१८) महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, कर्मवीर भाऊराव पाटील याना भारतरत्न देण्याची मागणी करणार

 

१९) शिवभोजन थाळी योजना केंद्राची संख्या वाढणार

२०) सरकारी रुग्णालयात मोफत औषध उपलब्ध करून देणार

 

२१) राज्यात सुक्ष्म व लघू उद्योगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणार

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *