जरांगे पाटलांच्या उमेदवारांची यादी कधी होणार जाहीर ?काय म्हणाले जरांगे ?

When will the list of candidates of Jarange Patal be announced? What did Jarange say?

 

 

 

 

यावेळी विधानसभा निवडणुकीमध्ये चूरस वाढण्याची शक्यता आहे. ही निवडणूक जरी महाविकास आघाडी विरोधात महायुती अशी होणार असली तरी देखील मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील

 

या निवडणुकीमध्ये उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. ज्या मतदारसंघात आपले उमेदवार निवडून येतील तिथे उमेदवार उभे करू आणि जिथे निवडून येण्याची शक्यता कमी आहे,

 

अशा मतदारसंघात जो उमेदवार मराठा आरक्षणाला पाठिंबा देईल त्याच्या पाठिशी उभे राहू अशी भूमिका जरांगे पाटील यांनी

 

झालेल्या बैठकीमध्ये मांडली. दरम्यान त्यानंतर आता पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी बैठकीबाबत एक महत्त्वाची घोषणा केली आहे.

 

या अगोदर आम्ही महाराष्ट्रातील इच्छुकांची बैठक घेतली होती, ती निवडणूक लढाईची की पाडायचे यासाठी होती. त्यावेळी आम्ही सांगितलं होतं, एका मतदारसंघात एकच उमेदवार द्या,

 

तुमच्या मतदारसंघात तुमच्या बैठका घ्या. येत्या 24 तारखेला अंतरवाली सराटीमध्ये जिल्ह्यानुसार बैठक घेऊन मी स्वत: बसून एक उमेदवार देण्याचा प्रयत्न करतो.

 

सगळ्यांनी फॉर्म भरले तर ते किचकट होईल. एका मतदार संघातून एक उमेदवार दिला तर ताकत लावता येईल. आपण त्या मतदार संघात एक फॉर्म ठेऊ आणि बाकीचे काढून घेऊ असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

 

 

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले ज्यांना फॉर्म काढून घ्यायला सांगण्यात येईल त्यांनी फॉर्म काढून घ्यावा, जर एखाद्या मतदारसंघात सांगूनही फॉर्म ठेवला तर

 

त्याने मुद्दाम फॉर्म ठेवला आणि मॅनेज झाला, त्याला मराठ्यांशी काही देणे -घेणे नाही असं माणण्यात येईल. मी आज आणि उद्या कोणते उमेदवार द्यायचे याची यादी करत आहे,

 

 

निवडणुका असल्याने अनेकजण आपल्या नावाचा वापर करू शकतात. आपल्या नावाने पैसे गोळा केली जाण्याचीही भीती आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी असले प्रकार होऊ नये

 

म्हणून सज्जड दम दिला आहे. कोणी जर माझ्या नावाखाली पैसे गोळा करत असेल तर त्या लोकांचे पैसे वर्गणी काढून परत करण्यात येईल. कुणाचा कपडा घेतला म्हटलं,

 

कुणाची चप्पल घेतली म्हटलं तर चप्पल तोंडावर फेकून मारेल, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. माझ्या नावाचा वापर करणारे कोण लोकं आहेत, हे मला माहीत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

 

 

मनोज जरांगे पाटील यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. सर्वच पक्षाचे उमेदवार मला भेटायला येत आहेत. आम्हाला त्याचं काही वाटत नाही.

 

सर्वच पक्षांच्या उमेदवारांचा आम्ही सन्मान करतोय. पण आमचं जे ठरलं आहे, तेच आम्ही करणार आहोत. आम्ही आता मागे हटणार नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं.

 

 

एकाच मतदारसंघात एकच उमेदवार द्यायचं ठरलं आहे. मलाच उमेदवारी मिळाली पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. तसं वाटणं स्वाभाविक आहे. पण सर्वांनीच निवडणुकीचे अर्ज भरले तर योग्य होणार नाही.

 

त्यामुळे एका व्यक्तीने एकच अर्ज भरा. आपल्याला आपली ताकद दाखवायची आहेच. पण शिस्तही दाखवली पाहिजे, असं मनोज जरांगे म्हणाले.

 

 

5-6 दिवसांत कळेल कोणते कोणते मतदारसंघ लढायचे. आम्ही 24 तारखेला इच्छुकांना बोलवलं आहे. जो बैठकीला येणार नाही, त्याने स्वत:ला गृहित धरू नये.

 

तुम्ही बैठकीला येणार नाही आणि फॉर्म भरणार असं कधी होणार नाही. हे मान्यच होणार नाही. त्यामुळे ज्यांना अर्ज भरायचे आहेत, त्यांनी बैठकीला आलंच पाहिजे, असंही ते म्हणाले.

 

एका मतदारसंघात एकच फॉर्म राहील. बाकीचे काढून घेतले जातील. एखाद्या मतदारसंघात फॉर्म ठेवण्यात आला तर त्याने मुद्दाम फॉर्म ठेवला आणि मॅनेज झाला, त्याला मराठ्यांशी काही देणे घेणे नाही,

 

आरक्षणाच्या मागणीशी काहीही देणेघेणे नाही, त्याला कोण्यातरी पक्षासाठी मते खायचे आणि विभाजन करायचे, असा त्याचा अर्थ घेतला जाईल. मी आज आणि उद्या कोणते उमेदवार द्यायचे याची यादी करत आहे, पण डिक्लेअर करणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

 

 

 

ज्या देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या लेकरांच्या डोळ्यात पाणी आणलं, आपल्या लेकरांच्या डोळ्यातून रक्त काढलं, मराठा समाजाला हीन वागणूक दिली,

 

त्यांना मतदान करायचं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्या आईबापाचं मतदान घेतलं पण आरक्षण दिलं नाही, असंही त्यांनी सांगितलं.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *