पत्रकारांच्या सर्वेक्षणात महाविकास आघाडीची राज्यात सत्ता
Mahavikas Aghadi is in power in the state in a survey of journalists
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे मतदान आज पार पडले. यंदाच्या निवडणुकीत महाविकासआघाडी विरुद्ध महायुती अशी लढत पाहायला मिळाली. आज झालेल्या मतदानानंतर आता महाराष्ट्रातील एक्झिट पोल समोर येण्यास सुरुवात झाली आहे.
नुकतंच पोलच्या एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. या एक्झिट पोलनुसार महायुतीला 129 ते 139 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महाविकासआघाडीला 136-145 जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. यानंतर आज महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. राज्यातील दिग्गज नेत्यांचं भवितव्य आता मतपेटीत कैद झालं आहे.
येत्या 23 नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका निकाल येण्याआधी विविध संस्थांनी केलेल्या सर्वेक्षण करण्यात आले.
या सर्वेक्षणातून एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीतून कुणाची सत्ता राज्यात येऊ शकते किंवा कशी राजकीय परिस्थिती निर्माण येऊ शकते, याबाबतचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आता रिपोर्टर’ पोलनुसार महायुतीला 129 ते 139 जागा मिळू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला. तर महाविकासआघाडीला 136-145 जागा मिळू शकतात असा अंदाज पाहायला मिळत आहे. तर इतर अपक्षांना 13 ते 23 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.
रिपोर्टर पोलच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात भाजपला सर्वाधिक 80 पेक्षा अधिक जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. यामुळे भाजप हा मोठा पक्ष ठरेल असा अंदाज आहे.
त्यापाठोपाठ शिवसेना शिंदे गटाला 25 पेक्षा अधिक जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवार गटाला 23 पेक्षा अधिक जागा मिळतील असा अंदाज आहे.
तर महाविकासआघाडीत काँग्रेस हा सर्वाधिक जागांवर यश मिळू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. काँग्रेसला 50 पेक्षा अधिक जागांवर यश मिळू शकते, असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवला जात आहे.
त्यापाठोपाठ राष्ट्रवादी शरद पवार गटाला 42 पेक्षा अधिक जागा आणि ठाकरे गटाला44 पेक्षा अधिक जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना 13 ते 23 जागा मिळण्याची शक्यता एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आली आहे.
????महायुती – 129 ते 139 जागा
भाजप – 80 पेक्षा अधिक जागा
शिवसेना शिंदे गट – 25 पेक्षा अधिक जागा
अजित पवार गट – 23 पेक्षा अधिक जागा
काँग्रेस 50 पेक्षा अधिक जागा
ठाकरे गट 44 पेक्षा अधिक जागा
शरद पवार गट 42 पेक्षा अधिक जागा
????इतर : 13 ते 23 जागा
????महाविकासआघाडी 136-145