17 ऑगस्टला महिलांच्या बँक खात्यात पैसे येणार नाहीत ?

Money will not come in the women's bank account on August 17?

 

 

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता येत्या 17 ऑगस्टला देण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून त्यासाठी सर्व तयारी केली जात आहे.

 

येत्या 17 ऑगस्टला राज्यातील 1 कोटी पेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी 3000 रुपये जमा होणार आहेत. असं असलं तरी राज्यातील 27 लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात येत्या 17 ऑगस्टला पैसे जमा होणार नाहीत.

 

त्यामागील कारणही समोर आलेलं आहे. या महिलांच्या बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक नसल्यामुळे त्यांना येत्या 17 ऑगस्टला योजनेचे पैसे मिळणार नाहीत.

 

पण त्यांना 17 ऑगस्ट नंतर 10 दिवसांनी योजनेचे पैसे मिळणार आहेत. या महिलांच्या बँक खाते आधार क्रमांकासोबत जोडण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील 1 कोटी 2 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा 17 ऑगस्टला लाभ मिळणार आहे. उर्वरित 27 लाख महिलांना 10 दिवसांनी योजनेचा लाभ मिळणार आहे.

 

अर्ज करणाऱ्या 27 लाख महिलांचे आधारकार्ड बँक खात्याशी लिंक नसल्याचं समोर आलं आहे. प्रशासनापुढे 3 दिवसांत 27 लाख महिलांचे आधार बँक खात्याशी लिंक करण्याचं आव्हान आहे.

 

विशेष म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्ट ही शेवटची मुदत असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. पण आता नवी माहिती समोर येत आहे.

 

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया पुढेही चालू राहणार आहे. 31 ऑगस्टनंतर आलेल्या लाभार्थ्यांनाही योजनेचा लाभ मिळणार आहे.

 

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1 कोटी 35 लाख लाभार्थी महिलांची यादी तयार झाली आहे. येत्या 17 ऑगस्टला 1 कोटी 2 लाख लाभार्थ्यांना पहिला हफ्ता मिळणार आहे.

 

तर 10 दिवसांनी उर्वरित 22 लाख लाभार्थी महिलांनाही पहिला हफ्ता मिळणार आहे. पात्र लाभार्थ्यांपैकी 27 लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक नाही. लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे.

 

 

राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रशासनाला महत्त्वाचं आवाहन केलं आहे. 17 ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घ्यावेत,

 

असं आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केलं आहे. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाची नुकतीच बैठक पार पडली तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याची माहिती समोर आली होती.

 

मंत्रिमंडळ बैठकीवेळी 27 लाख महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली होती. त्यावरुन मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त करत अधिकाऱ्यांना लवकरात लवकर सर्व बँक खाते आधारशी लिंक करण्याचे आदेश दिले होते.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *