अमित शाहनी मंत्र्यांचा तो कागद फेकून दिला;काय घडले कारण ?
Amit Shah threw that paper of the minister; what happened because?

केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारमध्ये खासदार सुरेश गोपी हे पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस राज्य मंत्री आहेत. राजकारणात येण्याआधी ते अभिनेते होते. आजही अभिनय त्यांचा प्राण आहे.
“अभिनय ही माझी आवड, उत्साह आहे. जर, मला चित्रपट करण्यापासून रोखलं, तर मी जिवंत राहू शकणार नाही” असं सुरेश गोपी म्हणाले.
अभिनेता ते नेता बनलेले सुरेश गोपी केरळमधून निवडून आलेले भाजपाचे पहिले खासदार आहेत. त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक जिंकली. सुरेश गोपी हे पर्यटन राज्य मंत्री आहेत.
तिरुवनंतपुरम येथे केरल फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सच्या एका कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. त्यावेळी गोपी म्हणाले की, “चित्रपट माझी आवड, उत्साह आहे.
जर मी चित्रपटात काम केलं नाही, तर मरुन जाईन. मी ओट्टाकोम्बन फिल्ममध्ये काम करण्यासाठी परवानगी मागितली आहे. मला अजूनपर्यंत परवानगी मिळालेली नाही. पण 6 सप्टेंबरपासून मी ओट्टाकोम्बन चित्रपटात काम सुरु करणार आहे”
“मी जवळपास 20 ते 22 चित्रपटात अभिनय करण्याची तयारी दाखवली आहे. किती चित्रपट बाकी आहेत, असं मला विचारण्यात आलं,
त्यावेळी मी अमित शाहना म्हणालो की, 20 ते 22 चित्रपटात काम करण्यासाठी मी सहमती दिलीय. त्यानंतर अमित शाहनी तो कागद फेकून दिला.
मी नेहमीच माझ्या नेत्यांच म्हणण ऐकीन. पण चित्रपट माझी आवड, उत्साह आहे, नाहीतर मी मरुन जाईन” असं सुरेश गोपी म्हणाले.
“मंत्री म्हणून काम करण्यासाठी मी मंत्रालयातून तीन ते चार लोकांना चित्रपटाच्या शूटिंगसाठी घेऊन जाईन” असं सुरेश गोपी म्हणाले.
सुरेश गोपी यांचा कॅबिनेटमध्ये समावेश झाल्यानंतर त्यांनी पक्षाला अडचणीत आणणारी भूमिका घेतली होती. केंद्रीय मंत्रालयात सहभागी झाल्यानंतर सुरेश गोपी लगेच मीडियाला म्हणाले होते की,
“मला एक खासदार म्हणून काम करायच आहे. मला कॅबिनेट बर्थ नको होतं. मी पक्षाला सांगितलेलं की, मला यात रस नाहीय. मला लवकरच दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे.
मी एक खासदार म्हणून चांगलं काम करीन हे त्रिशुरच्या लोकांना माहित आहे. मला चित्रपटात अभिनय करायचा आहे. पक्षाला त्यांचा निर्णय घेऊ दे”