अमरावतीमध्ये ५४ किलो सोने-चांदी सापडल्याने खळबळ

Excitement after finding 54 kg of gold and silver in Amravati

 

 

 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात पोलिसांनी ठिकठिकाणी नाकेबंदी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून या नाकेबंदीदरम्यान पोलिसांनी वाहन चेक करताना कोट्यवधी रूपये जप्त केले आहेत.

 

राज्यातील विधानसभा निवडणुकीदरम्यान काही चुकीचा प्रकार होऊ नये यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात येतोय. अशातच अमरावती जिल्ह्यातील तिवसा

 

येथे जवळपास सहा कोटी रूपयांचे सोने-चांदी पकडण्यात आले आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

तिवसा मतदार संघातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या चेकपोस्टवर तिवसा पोलीस स्टेशनंचे पीआय प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनात मंगळवारी (5 नोव्हेंबर) दुपारी एक वाजता दरम्यान एका वाहनाची तपासणी केली असता

 

त्यामध्ये पाच किलोपेक्षा अधिक सोने आणि चांदी आढळून आली. पकडण्यात आलेल्या सोने आणि चांदीची किंमत ही सहा कोटीपर्यंत असल्याचा अंदाज आहे. यावेळी इन्कम टॅक्स विभागाला प्राचारण करण्यात आले होते तर पुढील कारवाई पोलीस करीत आहे.

 

तिवसा चेकपोस्टवर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात सोने- चांदी पकडण्यात आले. याआधी पोलिसांकडून अशी कोणती कारवाई करण्यात आली नव्हती.

 

मंगळवारी मात्र वाहन तपासताना पोलिसांनी वाहनातून ५४ किलो ७०० ग्रॅम सोने आणि चांदी जप्त केली. या दागिण्यांचा कोणताही पुरावा वाहनचालकाकडे आढळला नाही. पोलिसांनी सर्व सोने जप्त केले असून या प्रकरणाचा आणखी तपास करत आहेत.

 

साताऱ्यातील शेंद्रे येथेही मंंगळवारी १ कोटी रूपयांची कॅश सापडली होती. क्रेटा गाडीमधून ही कॅश नेण्यात येत होती. पोलिसांना गाडीवर शंका आल्याने त्यांनी गाडीची तपासणी केली.

 

त्यावेळी १ लाखांची कॅश गाडीमध्ये असल्याचं निदर्शनास आले. पोलिसांनी ही कॅश जप्त केली असून ती नेमकी कोणाच्या मालकीची आहे, याबाबत पोलीस तपास करत आहेत.

 

पुणे बंगळुरू महामार्गावर सातारा जिल्ह्यामधील शेंद्रे येथे ही कारवाई करण्यात आली होती. निवडणूक जवळ येईल तशी असे प्रकार मोठ्या प्रमाणात समोर येण्याची शक्यता आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *