नांदेड शहरासह दोन तालुक्यांत भूकंप
Earthquake in two talukas including Nanded city

नांदेड शहर व तसेच अर्धापूर, हदगाव या तालुक्यातून आज दिनांक २२ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ०६.५२ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याची माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास प्राप्त झाली .
अधिकृतरित्या दिलेल्या वृत्तानुसार या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर ३.८ अशी नोंदविण्यात आलेली आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू नांदेड शहरापासून २९ किमी दूर उत्तरपूर्व दिशेला हदगाव तालुक्यातील सावरगाव या गावात असून या धक्क्यामुळे कुठलीही
जीवित व वित्त हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास प्राप्त झाली असल्याचे जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्राचे अधिकारी किशोर कुऱ्हे यांनी दिली आहे.