डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक पदाच्या ७३ जागांसाठी भरती

Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Recruitment for 73 Professor Posts

 

 

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात १६ वर्षानंतर प्राध्यापक भरतीचा मुहूर्त लागला आहे. विद्यापीठ परिसरातील विभागांमधील शिक्षक प्रवर्गातील ७३ जागा भरण्यात येणार असून

 

बुधवार २ एप्रिलपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली. २ मे दरम्यान केंद्र शासनाच्या ’समर्थ पोर्टल’ वरुन ‘ऑनलाईन’ पध्दतीने अर्ज करता येणार आहेत..

 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षक प्रवर्गातील २८९ जागा मंजूर असून आजघडीला १३० शिक्षक कार्यरत आहेत.

 

रिक्त १५९ जागांपैकी ७३ पदे भरण्यास राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागाने ७ ऑगस्ट २०१९ रोजी मान्यता दिली. यानंतर प्रक्रिया सुरु असताना २०२३ मध्ये त्यावर स्थगिती आली होती.

 

पुन्हा ही पदे भरण्यास परवाणगी देण्यात यावी यासाठी विद्यापीठ प्रशासनाने राज्य शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. अखेरीस मार्च २०२५ मध्ये पदभरतीस मान्यता देण्यात आली.

 

नवीन आर्थिक वर्षांच्या पहिल्याच दिवशी ७३ पद भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. यामध्ये प्राध्यापक आठ, सहायोगी प्राध्यापक १२ पदे व सहय्यक प्राध्यापकांची ५३ पदे भरण्यात येणार आहेत.

 

 

केंद्रशासनाने विद्यापीठ व वरिष्ठ महाविद्यालयांसाठी ‘समर्थ पोर्टल’ तयार केले असून या माध्यमातून ही संपूर्ण भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

 

यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लिंक देण्यात आली असून २ एप्रिल ते २ मे दरम्यान ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

 

तर ऑनलाईन अर्जाची प्रत व सर्व कागदपत्रासह हार्ड कॉपी आस्थापना विभागात ९ मे रोजी कार्यालयीन वेळेत दाखल करावी लागणार आहे.

 

हजारो अर्ज बाद; विद्यापीठाला लाभ!तत्कालिन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या कार्यकाळात सप्टेंबर २०२३ मध्ये भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. विद्यापीठाने दीड वर्षापूर्वी प्राध्यापक भरतीसाठी हे अर्ज मागविले होते.

 

त्यावेळी सुमारे ५८१५ उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केले होते. त्यातील सुमारे ४ हजार ६०० हॉर्डकापी जमा झाल्या होत्या. मात्र, आता व्यवस्थापन परिषदेने ती भरती प्रक्रियाच रद्द ठरविली असल्याने ते सर्व अर्ज बाद ठरविण्यात आले आहेत.

 

तसेच त्यांचे शुल्कही बुडाले आहे. विद्यापीठाला अर्जापोटी मोठी रक्कम विद्यापीठाच्या तिजोरीत जमा झाली होती. परंतु, आता हे अर्ज बाद झाल्याने संबंधितांचे शुल्कही बुडाले. हे जुने अर्ज ग्राह्य धरले जाणार नसल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *