भाजपचा मोठा नेता शरद पवार यांच्या भेटीला

A meeting with BJP leader Sharad Pawar

 

 

 

 

भाजपचे सांगलीचे माजी खासदार संजयकाका पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट झाल्याची माहिती समोर येत आहे.

 

संजयकाका यांनी शरद पवार यांच्या पुण्यातील मोदी बागेत जावून भेट घेतली आहे. संजयकाका पाटील यांनी अचानक शरद पवार यांच्या घरी जावून भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

 

या दोन नेत्यांच्या भेटीचे वेगवेगळे राजकीय कयास बांधले जात होते. राजकीय वर्तुळात तुफान चर्चा सुरु झाली होती. संजयकाका पाटील हे सांगली लोकसभा मतदारसंघात दोन वेळा भाजपच्या तिकीटावर जिंकून आलेले नेते आहेत.

 

नुकतंच राज्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत संजयकाका यांचा अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्याकडून पराभव झाला होता. संजयकाका पाटील यांच्या पराभवानंतर त्यांनी शरद पवार यांची त्यांच्या घरी जावून भेट घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

 

संजयकाका पाटील यांनी शरद पवारांच्या भेटीमुळे ते शरद पवार गटात तर जाणार नाहीत ना? अशी चर्चा सुरु झाली होती. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये सत्तेची समीकरणं बदलली आहेत.

 

एकेकाळचे परस्परांचे विरोधी असणारे पक्ष एकमेकांचे मित्र झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड सरमिसळ झाली आहे.

 

महाविकास आघाडीच्या हातून सत्ता खेचल्यामुळे भाजपला त्याचे परिणाम लोकसभा निवडणुकीत भोगावे लागले आहेत. यानंतर राज्यात आता आगामी काळात विधानसभा निवडणुका आहेत.

 

त्यामुळे या निवडणुकांमध्ये काय घडामोडी घडतात? कोण बाजी मारतं? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, शरद पवारांच्या भेटीनंतर संजयकाका पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

शरद पवार यांच्या भेटीनंतर संजयकाका पाटील यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “मी भाजपात समाधानी आहे. मी तुतारी हातात घेणार नाही. शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीत राजकीय विषयावर चर्चा झाली नाही.

 

येत्या 4 तारखेला सांगलीत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी शरद पवारांची भेट घेतली.

 

बाकी काही विषय नाही”, असं संजयकाका पाटील यांनी स्पष्ट केलं. तसेच “भेटीनंतर मला अनेक जणांचे फोन आले”, असंही संजयकाका पाटील यांनी सांगितलं.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *