अलग अंदाज ;VIDEO ;राहुल गांधीं मोचीच्या दुकानात चपला, बुटं शिवताना दिसले
Alag Adaz ;VIDEO ;Rahul Gandhi was seen sewing shoes in a cobbler's shop
काँग्रेस नेते राहुल गांधी शुक्रवारी (26 जुलै) मानहानीच्या खटल्यात हजर राहण्यासाठी उत्तर प्रदेशातील सुलतानपूर न्यायालयात पोहोचले होते.
यादरम्यान राहुल गांधी यांचा पुन्हा एकदा आगळा वेगळा अंदाज पाहायला मिळाला. न्यायालयात हजेरी लावल्यानंतर तिथून परतत असताना राहुल गांधी अचनाक एका दुकानात पोहोचले.
ते दुकान होतं एका मोच्याचं. त्या दुकानात थांबून त्यांनी तेथील लोकांची विचारपूस केली. त्याचवेळी त्यांनी दुकानात थांबून चपला
आणि बुटांना टाके घातले. दुकानदाराच्या मदतीनं चपल कशी शिवली जाते हे पाहता-पाहता स्वतःही ती चप्पल शिवून पाहिली.
रायबरेलेची खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 26 जुलै रोजी मानहानीच्या खटल्यात सुलतानपूरच्या एमपी-एमएलए न्यायालयात हजेरी लावली.
न्यायालयीन कामकाज संपवून राहुल गांधी पुन्हा पूर्वांचल एक्सप्रेसवे मार्गे लखनौला रवाना झाले. त्यावेळी तिथून ते दिल्लीला जाणार होते,
मात्र पूर्वांचल द्रुतगती मार्गापूर्वी त्यांचा ताफा अयोध्या प्रयागराज महामार्गावरील कुरेभर पोलीस स्टेशन हद्दीतील आमदार नगर चौकाजवळ अचानक थांबला आणि राहुल गांधी गाडीतून उतरले आणि रामचेत नावाच्या मोच्याच्या दुकानाकडे निघाले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जाऊन रामशेत यांच्या शेजारी त्यांच्या दुकानात बसून त्यांची प्रकृती जाणून घेतली. राहुलला पहिल्यांदा रामचेत यांच्याकडून त्याच्या व्यावसायाबाबत आणि कुटुंबाबाबत गप्पा मारल्या.
मग, रामचेत यांना विचारलं की, गरिबांना कोणत्या गोष्टींची सर्वाधिक गरज आहे आणि त्यावरही चर्चा केली. शूज आणि चप्पल कशा दुरुस्त केल्या जातात?
असा प्रश्नही राहुल यांनी रामचेतला विचारलं. घर कसं सांभाळायचं याबाबतही त्यांनी रामचेतकडे विचारपूस केली. राहुल गांधी आपल्या दुकानात आले,
तिथे त्यांनी स्वतःच्या हातानं बुटांना, चपलांना टाके घातले, हे पाहून रामचेत काहीसे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. राहुल गांधी त्यांच्या छोट्याशा दुकानात बसून चप्पल शिवत आहेत,
यावर त्यांना आधी विश्वासच बसत नव्हता. यानंतर रामचेत यांनी राहुल गांधींसाठी कोल्ड्रिंक मागवलं आणि दोघांनी एकत्र कोल्ड्रिंक प्यायलं. रामचेत यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
थकिए न.. थमिए न.. चालता रहिए ❤️ pic.twitter.com/DIMuIq2NVT
— Congress (@INCIndia) July 26, 2024
काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यावर मोची राम चेत यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, आम्ही त्यांना (राहुल गांधी) सांगितलं आहे की,
मी भांडवलापेक्षा फारच कमी कमावतो, मी गरीब आहे. कृपया आम्हाला थोडी मदत करा. मी त्यांना बुटांना शिलाई कशी करायची ते दाखवलं.
राहुल गांधी यांनीही त्यांना मदत केली. मोच्यांचे प्रश्न लोकसभेत मांडण्याचे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी दिलं.