मनोज जरांगे पाटलांची अंतरवालीमधून मोठी घोषणा
Manoj Jarange Patal's big announcement from Antarwali

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला, त्यांच्या आंदोलनानंतर सरकारकडून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मंजूर करण्यात आलं.
मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या मागणीवर अजूनही मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती,
आपण निवडणुकीत उमेदवार देणार आहोत असं त्यांनी म्हटलं होतं. तसेच जीथे उमेदवार निवडून येण्याची शक्यत आहे, तिथेच उमेदवार देणार,
जीथे शक्यता नाही तीथे मराठा आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या उमेदवारांच्या पाठिशी उभे राहा अशी आपली भूमिका देखील त्यांनी स्पष्ट केली होती.
त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्याकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा, मुस्लिम आणि दलित समाजाची मोट बांधण्याचा देखील प्रयत्न झाला. मात्र त्यानंतर ऐनवेळी मनोज जरांगे पाटील यांनी
निवडणुकीतून माघार घेतली. निवडणुकीमधून माघार घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची पुढची रणनीती काय असणार याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती, आता त्यांनी रणनीती हळूहळू स्पष्ट होताना दिसत आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा जुना डाव खेळला आहे. त्यांनी आज अंतरवालीमध्ये महत्त्वाची घोषणा केली आहे. आजपासून आमच्या पुढील आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे,
कोणी येऊ द्या आम्ही उभा आहोत मस्तीत यायचे नाही गुरमीत वागायचे नाही, हा मराठा तुम्हाला लढून गुडघ्यावर टेकवणारा होणार आहे.
मराठ्यांना हरवण्याची ताकद कोणातही नाही, तुमचा गेम करणार आहोत. पुन्हा आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. मी तर आमरण उपोषणाची तयारी केली आहे,
आम्ही सामूहिक उपोषण करणार आहोत अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमधून केली आहे. मी माझ्या समाजाला न्याय देईल असंही यावेळी त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा निर्णय घेतला तर जरांगे यांचा हा निर्णय नव्या सरकारची डोकेदुखी वाढू शकतो.
दरम्यान मराठा समाज संभ्रमात आहे असं पसरवलं जात आहे, मात्र मराठा समाज संभ्रमात नाही. ज्यांना स्वत:ला निवडून यायचं आहे, ते संभ्रम निर्माण करत आहेत.
समाजाला सर्व माहीत आहे. ज्याला पाडायचे त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचे त्याला निवडून आणा, मी स्पष्ट सांगितलं आहे. ज्यांनी अन्याय केला डोक्याच्या चिंधड्या केल्या त्यांना सोडायचं नाही.
आपल्या मागणीशी संबंधित असणाऱ्यांचे व्हिडीओ करून घ्या, जो आपल्या मागण्याशी सहमत राहील त्यांला निवडून आणा, पण तो व्हिडीओ व्हायरल करू नका असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की गाव पातळीवर याबाब निर्णय घ्यावा, व्हिडीओ पण बनवा आणि लिहून पण घ्या. गावागावात व्हिडीओ बनवा, पण ते व्हायरल करू नका.
आता मला विचारायचे काम नाही. मी काही पक्ष सांगितला नाही. तुम्हाला कोण पाहिजे, कोण मदतीला येतो, तुमच्या आरक्षणाबद्दल बोलतो ते बघा, आपण कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. महायुती, महाविकास आघाडी, अपक्ष असा कुणालाही पाठिंबा दिलेला नाही.
राजकारणाच्या तयारी पेक्षा आपण आता आंदोलनाची तयारी सुरू करू, कोणीही आले तरी आपल्याला आंदोलन करावेच लागणार आहे. मराठ्यांनी एकजुटीने मतदान करा.
आरक्षणाला विरोध करणाऱ्याला सोडायचं नाही. आपल्याला आरक्षण पाहिजे, आपण राजकारण करायचे नाही. पण आरक्षणाला विरोध करणाऱ्याला सोडायचं नाही.
देवेंद्र फडणवीस देखील आपलं काही करू शकत नाही. आपण आरक्षणासाठी पुन्हा मोट बांधू. मराठ्यांनी एकजूट फुटू देऊ नका, असा मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.