चक्क भरसभेत महिलेने मोठ्या नेत्याच्या थोबाडीत लगावल्याने खळबळ

There was a lot of excitement when a woman slapped a big leader in the assembly

 

 

 

 

बसपच्या प्रदेशाध्यक्षपदी नवीन नियुक्ती झाली तरी, असंतोष आणि गटबाजी थांबलेली नाही. मुंबईत बुधवारी राज्य समितीच्या बैठकीत

 

भंडारा जिल्ह्यातील महिला कार्यकर्त्याने प्रदेश प्रभारी खासदार रामजी गौतम यांच्या थेट कानशिलात लगावली. अचानक घडलेल्या या प्रसंगाने संपूर्ण सभागृह अवाक झाले आणि कार्यकारिणीची विस्तारही लांबला.

 

विधानसभा निवडणुकीच्या तयारींतर्गत बसपची संघटनात्मक फेररचना करण्यात येत आहे. परमेश्वर गोणारे यांना पायउतार करून ॲड. सुनील डोंगरे यांची प्रदेशाध्यक्ष नियुक्ती करण्यात आली.

 

त्यांच्या नियुक्तीनंतर मुंबईत बुधवारी पहिलीच राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली. यात पदाधिकाऱ्यांची घोषणा व जबाबदारी निश्चित करून आगामी काळातील कार्यक्रम दिले जाणार होते.

 

बैठकीच्या सुरुवातीला पाहुण्यांच्या स्वागतासाठी भंडारा जिल्ह्याच्या अड्याळ येथील रहिवासी निमा रंगारी कार्यकर्त्यांसह रांगेत व्यासपीठावर गेल्या.

 

स्वागताचा स्वीकार करणारे रामजी गौतम यांचे स्वागत करण्याऐवजी रंगारी यांनी त्यांच्या कानाखाली आवाज केला. त्यामुळे सभागृहात गोंधळ उडाला तर,

 

दुसरीकडे ‘सुनील डांगरे मुर्दाबाद’च्या घोषणा सुरू झाल्या. अन्य कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केली. रंगारी यांना बाजूला करून पोलिसांच्या स्वाधीन केले.

 

तसेच, असंतोष व्यक्त करणाऱ्या कार्यकर्त्यांसोबत मारहाण झाली. सभागृहात प्रचंड गोंधळ झाल्याने कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली नाही.

 

निमा रंगारी यांनी विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यांना सहा मते मिळाली होती. त्यापूर्वी जिल्हा परिषदेची निवडणूकही लढल्या होत्या.

 

लोकसभेत त्यांनी भंडारा-गोंदिया मतदारसंघात दावा केला होता. प्रदेश प्रभारी रामजी गौतम आणि तत्कालीन प्रदेशाध्यक्ष परमेश्वर गोणारे यांनी आश्वासन दिल्यानंतरही त्यांना संधी मिळाली नाही.

 

 

त्यामुळे नाराज झालेल्या रंगारी यांनी असंतोषाला वाट मोकळी करून दिली. या बैठकीसाठी नागपुरातून योगेश लांजेवार, नागोराव जयकर, पृथ्वी शेंडे, उमेश मेश्राम, मंगेश ठाकरे आदी गेले होते.

 

‘निवडणुकीत उमेदवारी दिली नाही. पैसे घेऊन उमेदवार निश्चित करण्यात आले. पक्षाध्यक्ष मायावती यांच्याबद्दल कुठलाही नाराजी नाही.

 

मात्र, राज्यात सुरू असलेल्या गोंधळाबद्दल सर्वसामान्यांच्या भावना व्यक्त केल्या’, असे निमा रंगारी म्हणाल्या. याबाबत ॲड. सुनील डोंगरे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *