उपमुख्यमंत्री शिंदेंना कार बॉम्बने उडवून देणाऱ्या दोघांना बुलढाण्यात अटक

Two arrested in Buldhana for blowing up Deputy Chief Minister Shinde with a car bomb

 

 

बुलडाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्यासाठी धमकी देण्यात आली होती.

 

दोन तरुणांनी ई-मेलद्वारे शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. अखेरीस पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत दोन जणांना अटक केली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 35 वर्षीय मंगेश अच्युतराव वायाळ आणि 22 वर्षीय अभय गजानन शिंगणे असं या आरोपींची नावं आहे.

 

मंगेश वायाळ हा ट्रक चालक असून अभय शिंगणे याचं देऊळगाव इथं मुख्य मार्गावर मोबाईल शॉपी आहे. या दोघांनाही दारूचे व्यसन असून या दोघांनी अभय शिंगणे याच्या मोबाईल शॉपीतून ही धमकी दिल्याची माहिती मिळाली आहे.

 

विशेष म्हणजे, हे दोघेही नात्याने आते-माम भाऊ आहेत. या दोन्ही आरोपींना बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव मही येथून मुंबई एटीएसने कारवाई करत ताब्यात घेऊन मुंबईकडे निघाले आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. गोरेगाव पोलीस ठाण्यात हा धमकीचा ई-मेल आला होता. पोलिसांनी ई-मेल पाठणाऱ्यांचा शोध सुरू केला.

 

मुंबईतील इतर पोलीस ठाण्यांमध्येही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमकीचा मेल आला होता. ई-मेलमध्ये एकनाथ शिंदे यांची मोटार बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती.

 

याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 351(3), 351(4) व 353 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आरोपींना अटक करण्यात आली असून चौकशीसाठी मुंबईत नेण्यात आलं आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *