मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा,मराठा आंदोलन दडपण्यासाठी सरकारचा मोठा प्लन
Manoj Jarange's sensational claim, government's big plan to suppress Maratha movement

भाजप आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यात झालेल्या गुप्त भेटीनंतर विरोधकांकडून टीका होत असताना मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सुरेश धसांची पाठराखण केली आहे.
तसेच विरोधकांकडून धसांवर होणार आरोप ही राजकीय चिखलफेक आहे, असे जरांगे म्हणाले. तसेच दोन मंत्र्यांच्या सोबतीने नवं आंदोलन उभारण्याचा सरकारचा डाव असल्याचा दावा मनोज जरांगेंनी केला आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीत काहीतरी मोठी डील झाल्याचा दावा केला. संजय राऊत यांनी केलेले आरोप हे राजकीय चिखलफेकीसाठी असू शकतात असे मनोज जरांगे म्हणाले.
मात्र त्यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेणं हे चूक असून यापुढे मी सुरेश धस यांची भेट घेणार नाही आणि त्यांना भेट देणार ही नसल्याचं मनोज जरांगे यांनी ठणकावून सांगितलं आहे.
राज्य सरकारने मराठा आरक्षण आंदोलन दडपण्यासाठी एक रणनीती आखल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. सरकार मराठा आंदोलन मोडण्यासाठी एक नवीन 22 लोकांचे आंदोलन उभे करत आहे.
मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेट दिली असून हे आंदोलन उभा करण्याचे ठरवलं आहे. त्याला सरकारमधील दोन मंत्री साथ देणार असल्याचा गौप्यस्फोट मनोज जरांगे यांनी धाराशिव येथे पत्रकारांशी बोलताना केला
मनोज जरांगे म्हणाले, 22 फेब्रुवारी ते 22 मार्च आपल्याला काही गोष्टी कराव्या लागणार आहेत एवढचं बोलतो. आपण एक आलो आरक्षण मिळालं,राहिलेले आरक्षण पण मिळेल .
नुसती गर्दी आणि मोठ्या सभेतून आपल्या समस्या सुटणार नाहीत. गावात येणारी अडचण. सांगायला हक्काचं ठिकाण आपल्याला द्यावं लागणार आहे. त्यासाठी गावात एक मुलगा द्यावा लागणार आहे.
त्याला संपूर्ण गाव अडचणी सांगेल असे जरांगे पाटील म्हणाले. त्यासाठी एक महिना आपण ते काम करत आहोत. आपल्याला सामाजिक अंतर दूर करण्यासाठी काम कराव लागणार आहे.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळून देण्यासाठी मोठा लढा उभारला. त्यांच्या आंदोलनानंतर सरकारनं
मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली. मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या मागणीवर अजूनही मनोज जरांगे पाटील ठाम आहेत.