महाराष्ट्रामध्ये मराठा राहणार का नाही ?छगन भुजबळांचा जरंगेना सवाल

Why won't there be Marathas in Maharashtra? Chhagan Bhujbal asked Jarangena

 

 

 

 

ओबीसीतून मराठा आरक्षण मिळणं शक्य नाही..मराठ्यांनी वेगळं आरक्षण घ्यावं… सांगलीतल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यात छगन भुजबळांचं मोठं विधान केले आहे.

 

सर्वांनीच कुणबी व्हायचं आहे, तर महाराष्ट्रात मराठा राहणार का नाही ? असा प्रश्न उपस्थित करत मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला.

 

OBC मधून मराठा समाजाला आरक्षण देणार नाही म्हणजे नाही. न्यायालयाने देखील असचं म्हटल आहे. आधी ओबीसी आरक्षणाचा बॅकलॉग भरा मग बाकीच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवा.

 

OBC ला धक्का लावून आरक्षण देणार नाही असं सर्वांनीच म्हंटले आहे. तरी देखील आम्हाला टार्गेट करण्याचे कारण काय? असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला.

 

 

महाराष्ट्र वाचवला पाहिजे. नाहीतर महाराष्ट्र लुळा पांगळा होऊन जाईल. तुम्हाला आरक्षण पाहिजे, कायद्याने जे काही असेल ते घ्या. आम्ही वेगळे काही मागितले नाही.

 

सर्वांनीच कुणबी व्हायचं आहे, तर महाराष्ट्र मध्ये मराठा राहणार का नाही ? जारांगे एकटेच भाषण करतात. पण आम्ही सर्वांना बोलायला देतो.

 

सगळ्यांना समान वागणूक देतो. आम्ही काय वेगळे मागत नाही, आम्ही वेगळे आरक्षण द्यायला विरोध केला नाही. महाराजांचे नाव घेत आमच्यावर हल्ले केले जात आहेत.

 

सगळ्यांना न्याय देण्यासाठी एकत्र यायचे आहे. महायुतीचे सरकार असले तरी पण ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य नाही.

 

मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्या,पण ओबीसी मधून नाही. महायुती सरकार ओबीसी मधून आरक्षण देणार नसले तर महाविकास आघाडीला पण विचारा.

 

शरद पवार उध्दव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांना विचारा ओबीसी मधून आरक्षण देणार का? मग कोणीच देणार नसतील सांगत असेल तर मग आम्हाला टार्गेट का करता.

 

 

निवडणूक लढवण्याचे भाषा करत आहेत. हिंमत असले तर निवडणूक लढावावी अस चॅलेंज आहे. 288 जागा लढावाव्यात असे आव्हान भुजबळ यांनी जरांगे यांना दिले आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *