शिवसेनेची तिसरी यादी जाहीर

Third list of Shiv Sena announced

 

 

 

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने तिसऱ्या यादीत १५ जणांची नावे जाहीर केली आहे.

 

यात मुंबादेवी मतदारसंघातून शायना एनसी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर कन्नडमधून दानवे कन्या संजना जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

 

शिवसेनेच्या तिसऱ्या यादीतील उमेदवार

सिंदखेडराजा- शशिकांत खेडेकर
घनसवांगी- हिकमत उढाण

 

कल्याण ग्रामीण- राजेश मोरे
भांडूप पश्चिम- अशोक पाटील
मुंबादेवी- शायना एनसी

 

कन्नड- संजना जाधव
संगमनेर- अमोल खताळ
श्रीरामपूर- भाऊसाहेब कांबळे

 

नेवासा- विठ्ठलराव लंघे पाटील
धाराशिव- अजित पिंगळे

 

करमाळा- दिग्विजय बागल
बार्शी- राजेंद्र राउत
गुहागर- राजेश बेंडल

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने आतापर्यंत ८० उमेदवार जाहीर केले आहेत. उद्या विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे.

 

त्यामुळे अजून किती उमेदवार शिवसेनेकडून जाहीर केले जाता हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दरम्यान महायुतीतील घटकपक्ष असलेल्या भाजपच्या उमेदवारांची संख्या १४६ इतकी झाली आहे.

 

शिवसेना शिंदे गटाने तिसऱ्या यादीत कल्याण ग्रामीण विधानसभेतून शहरप्रमुख राजेश मोरे यांना दिली उमेदवारी दिली आहे. यामुळे कल्याण ग्रामीण मध्ये तिरंगी लढत होणार आहे.

 

विशेष म्हणजे लोकसभेत मनसेने बिनशर्त पाठींबा देऊनही शिंदे गटाने मनसे आमदार राजू पाटील यांच्या समोर उमेदवार उभा केला आहे.

तिसरी यादी जाहीर करताना शिवसेनेने आपल्या मित्र पक्षांसाठी दोन जागा सोडल्याचे जाहीर केले. यात एक जागा जनसुराज्य पक्षासाठी तर दुसरी जागी राजश्री शाहुविकास आघाडीला देण्यात आली आहे.

 

हातकणंगलेची जागी जनसुराज्य पक्षाला देण्यात आली असून येथून अशोकराव माने हे उमेदवार असतील तर शाहुविकास आघाडीला देण्यात आलेल्या शिरोळमधून राजेंद्र पाटील येड्रावकर हे उमेदवार आहेत.

 

संगमनेरची जागा एकनाथ शिंदे गटाकडे गेल्याने तेथून विधानसभा निवडणूक लढविण्याचे भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे यांचे स्वप्न भंगले. गेल्या काही काळापासून त्यांनी संगमनेर मध्ये आक्रमकपणे तयारी केली होती. मात्र पक्षाने ही जागा शिंदे गटाला सोडली आहे.

 

 

Image

 

 

 

 

Image

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *