लोकसभेसाठी भाजपची विशेष रणनीती; देवेंद्र फडणवीसांची विशेष मोहीम

BJP's Special Strategy for Lok Sabha; Special campaign by Devendra Fadnavis

 

 

 

 

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने विशेष रणनीती आखली आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातील 45 हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार भाजपने केला आहे.

 

 

त्याअंतर्गत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचाराचा धडाका उडवून देणार आहेत. फडणवीस राज्यभर मॅरेथॉन दौरा करणार आहेत.

 

 

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचाराच्या मैदानात उतरणार असून ते फेब्रुवारीपासून दररोज 3 सभा घेणार आहेत. लवकरच या दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर होईल.

 

महायुतीच्या आमदार आणि खासदारांसोबत फडणवीस प्रचार करणार आहेत. केंद्रात नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्याचाचा एक भाग म्हणून उत्तर प्रदेश नंतर मोठे राज्य असलेल्या महाराष्ट्रावर भाजपने लक्ष केंद्रीत केलं आहे.

 

 

 

महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. त्यापैकी महायुतीने 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपने फेब्रुवारीपासून राज्याच प्रचाराचा धडाका लावण्याचं निश्चित केलं आहे. राज्यातील भाजपचा चेहरा असलेले देवेंद्र फडणवीस या निमित्ताने राज्य पिंजून काढणार आहेत.

 

 

 

सी व्होटरच्या सर्व्हेमध्ये राज्यात महाविकास आघाडीला फायदा होणार असून महायुतीला मोठा धक्का बसणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

मी प्रत्येक सर्व्हेचा सन्मान करतो, पण कोणताही सर्व्हे असो फक्त मोदींचीच हवा असणार आहे, जनतेने ठरवलं आहे मोदींनाच निवडून द्यायचं.

 

 

त्यामुळे आम्ही 40 च्या वरती जाणार म्हणजे जाणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर अशा प्रकारच्या सर्व्हेला कोणताही आधार नसतो, पाच राज्यांचे सर्व्हे आठवा आणि निकालही आठवा अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.

 

 

 

महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा असून जनमत चाचणीत महाविकास आघाडीचा वरचष्मा दिसत आहे. आज जर महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक झाली असती तर पोलनुसार भाजप महायुतीला+ 19-21 जागा मिळाल्या असत्या, तर

 

 

 

महाविकास आघाडीला + 26-28 जागा मिळाल्या असत्या. इतरांना 0-2 जागा मिळाल्या असत्या. मतांच्या टक्केवारीनुसार, भाजपला + 37 टक्के, काँग्रेसला+ 41 टक्के आणि इतरांना 22 टक्के मते मिळतील.

 

 

 

कोणाला किती जागा?
स्रोत- सी व्होटर

लोकसभेच्या जागा – 48
भाजप+ 19-21
काँग्रेस + 26-28
इतर- 0-2

 

 

महाराष्ट्रात कोणाला किती मते?
स्रोत- सी व्होटर

लोकसभेच्या जागाा- 48
भाजप+ 37 टक्के
काँग्रेस + 41 टक्के
इतर – 22 टक्के

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *