मनोज जरांगे पाटील फडणवीस सरकारचे टेन्शन वाढवणार ,दिली तारीख
Manoj Jarange Patil will increase tension of Fadnavis government, date given
मनोज जरांगे पाटील हे आता आरक्षणाच्या मुद्दावरून परत एकदा मैदानात उतरताना दिसत आहेत. त्यांनी सरकारला मोठा इशारा दिलाय.
25 जानेवारीपासून मराठा आरक्षणासाठी पुन्हा एल्गार पुकारण्यात आलाय. मराठा समाजाला गांभीर्याने घेतलं नाही तर काय होतं हे त्यांना चांगलं माहित आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनाही ते माहित आहे आता फक्त खांदे बदलले आहेत.
पण आमच्यात सरळ करण्याची ताकद आहे, त्यांना दिसून येईल 25 तारखेला महाराष्ट्रात काय होईल.
त्यांचे भागले म्हणून ते आरक्षणाबाबत बोलत नाही त्यांना पुन्हा मराठ्यांच्या दारातून जायचं आहे. असे थेट मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
जरांगे पाटील म्हणाले, या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा विषय तडीला काढा. 25 जानेवारीची वाट पाहिली तर राज्यातील सर्व समाज अंतरवालीला येणार आहे.
कुणबी नोंदी शोधला पाहिजे काही कक्ष बंद पडले आहेत ते सुरू करा. प्रमाणपत्र वितरित केले जात नाहीत.
आम्ही याबाबत सरकारला निवेदन दिले आहे. तुम्ही सत्तेत असाल, बलाढ्य असाल. मात्र मराठ्यांपुढे सत्ता टिकत नाही हे तुम्हाला 25 जानेवारीला दिसून येईल.
मराठा आणि कुणबी एकच आहे त्यामुळे तो अध्यादेश पारित करावा. हैदराबाद गॅजेट लागू करा सगे सोयरे अंमलबजावणी करा.
या सर्व मागण्या 25 जानेवारीच्या आत मान्य करायच्या आहेत. तुम्ही 25 तारखे आधी आरक्षण दिले नाही तर सळो की पळो करणार,
असेही मनोज जरांगे यांनी म्हटले. यावेळी मनोज जरांगे यांनी म्हटले की, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला 11 दिवस झाले आहेत.
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर एसपी आणि कलेक्टर यांच्याशी बोलणार आहे.
दहा दिवस उलटून आरोपी पकडणार नसतील तर आता शंका येत आहे. काही नेत्यांच्या दबावामुळे पोलीस प्रशासन जाणून आरोपीला पकडत नाहीत का अशी शंका येत आहे.
जर जाणून बुजून आरोपीला पकडणार नसतील तर पूर्ण मराठा समाज रस्त्यावर उतरेल. जर समाज तुमच्यावर विश्वास ठेवत असेल
आणि तुम्ही विश्वासघात करत असाल आम्ही जास्त दिवस वाट बघणार नाही नाईलाज आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल हे पोलीस प्रशासनाने लक्षात घ्यावे, असे जरांगे यांनी म्हटले.