महादेव बेटिंग अ‍ॅप पुन्हा चर्चेत; बीड जिल्ह्यात 9 अब्ज रुपयांचा व्यवहार आ . सुरेश धस यांचे गंभीर आरोप

Mahadev betting app in the news again; Transaction worth Rs 9 billion in the name of one person. Serious allegations by Suresh Dhas

 

 

 

आमदार सुरेश धस यांनी बीडच्या पोलीस अधीक्षाकांची भेट घेतली, या भेटीनंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.

 

सुरेश धस यांच्या आरोपांमुळे पुन्हा एकदा महादेव बेटिंग अ‍ॅप घोटाळा चर्चेत आला आहे. जिल्ह्यात महादेव बेटिंग अ‍ॅपच्या नावाखाली अब्जावाधी रुपयांचा घोटाळा झाल्याचं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.

महादेव बेटिंग अ‍ॅपमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. एका व्यक्तीच्या नावावर नऊ अब्ज रुपयांची नोंद आहे. याचाच अर्थ याप्रकरणात अब्जवाधी रुपयांचा घोटाळा झाला आहे.

 

या प्रकरणात जे चांगले काम करणारे अधिकारी होते, त्यांना बाहेर काढण्यात आलं, आणि दुसरे अधिकारी आणून बसवले. या प्रकरणातील आरोपींना जामीन मिळून देण्यासाठी मदत करण्यात आली.

 

त्यांना सहकार्य करण्यात आलं. या घोटाळ्याची लिंक मलेशियापर्यंत आहे. मतदारसंघात एका व्यक्तीच्या नावावर 9 अब्ज रुपयांचा व्यवहार आहे. मात्र अजूनही काही ठिकाणी पोलीस दल निष्क्रियता दाखवत आहे, असा आरोप सुरेश धस यांनी केला आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, आज मी पोलीस अधीक्षाकांची भेट घेतली. त्यांना लेखी पत्र दिलं आहे. त्यामध्ये बीड जिल्ह्यातल्या पोलीस दलातील पोलिसांची यादी मला द्यावी अशी मागणी मी केली आहे.

 

त्यांची संख्या बिंदू नामावली प्रमाणे आहे का? हे चेक केलं जाईल. ती तशी नसेल तर हा बीड जिल्ह्यावर अन्याय आहे. हे मी राज्य सरकारच्या लक्षात आणून देईल.

 

मग त्यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील. बीड जिल्ह्यातलं कोणतंही प्रकरण घ्या, त्यामागे आकाच असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

 

एकट्या सिरसाळ्यामध्ये 600 विटभट्ट्या आहेत, त्यातील 300 विटभट्ट्या या इनलिगल आहेत. गायरान जमिनीवर जे गरिबांचे घर होते, त्यांना पण हटवण्यात आलं.

 

तीथे शॉपिंग मॉल बांधण्यात आले, बीडमधील कोणतंही प्रकरण असो, त्यामागे आकाच असल्याचा आरोप यावेळी सुरेश धस यांनी केला आहे. यामुळे आता पुन्हा एकदा बीडचं राजकारण तापण्याची शक्यता आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *