भाजप महाराष्ट्रातून सहा तगडे चेहरे लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत

BJP is preparing to field six strong faces from Maharashtra in the arena of Lok Sabha

 

 

 

 

 

भारतीय जनता पक्ष लोकसभा निवडणुकांना चारशे पार या मिशनसह उतरली आहे. महाराष्ट्रातही ४५ जागा जिंकण्याचे महायुतीचे लक्ष्य आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक जागा पक्षासाठी महत्त्वाची आहे.

 

 

 

 

म्हणूनच फडणवीसांच्या पहिल्या कॅबिनेटमधील सहा तगडे चेहरे लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची तयारी केंद्रीय नेतृत्वाने सुरु केली आहे.

 

 

परंतु एखादा अपवाद वगळता ही आजी-माजी आमदार मंडळी खासदारकीसाठी मैदानात उतरण्यास उत्सुक नसल्याचं समजतं.

 

 

देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये मंत्रिपद भूषवलेल्या सहा जणांची नावं चर्चेत आहेत. ‘एबीपी माझा’ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

 

 

 

 

सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, विनोद तावडे यांना लोकसभेला उतरवलं जाण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

परंतु यापैकी किती जण लढवण्यास उत्सुक आहेत, तयार होणार आहेत, आणि कोण मागे हटणार, हा प्रश्नच आहे. परंतु पराभव झाला, तरी पुन्हा आमदारकीची संधी असल्याने काही जण चाचपून पाहू शकतात.

 

 

 

दरम्यान, खुद्द सुधीर मुनगंटीवार यांनीच आपल्याला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा असून ती मिळू नये यासाठी आपणच प्रयत्नशील असल्याचं उघडपणे सांगितलं आहे.

 

 

 

माझं तिकीट कापलं जावं, यासाठी प्रार्थना करा, असं मुनगंटीवारांनी जाहीर सांगितल्याने त्यांचं काय होणार, हा प्रश्न विचारला जात आहे.

 

 

प्रीतम मुंडे यांच्या जागी बीड लोकसभा मतदारसंघातून त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांना तिकीट मिळण्याची चिन्हं आहेत. नुकतंच पंकजा मुंडे यांनी पाच वर्षांना राजकीय वनवास भरपूर वाटल्याचं बोलून दाखवलं होतं.

 

 

 

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्याकडून पंकजांना पराभवाचा धक्का बसला. त्यानंतर जवळपास सगळ्याच विधानपरिषद,

 

 

 

 

राज्यसभा निवडणुकांच्य वेळी पंकजा मुंडेंच्या नावाची चर्चा होई, परंतु त्यांच्या पदरी काहीच पडत नव्हते. अखेर लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने त्यांना संसदेची पायरी चढण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.

 

 

 

याशिवाय चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, गिरीश महाजन हे दिल्लीच्या राजकारणात जाण्यास फार उत्सुक नसल्याचं बोललं जात आहे. विनोद तावडे यांनीही आपल्याकडे हरियाण बिहारची जबाबदारी आहे,

 

 

 

असं सांगत लोकसभेला नकार दिल्याची माहिती आहे. याशिवाय, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी सिंधुदुर्गातून लोकसभा लढवण्यास सांगितल्याची चर्चा आहे. परंतु त्यांनीही आपल्याऐवजी प्रमोद जठार यांचं नाव पुढे केल्याचं म्हटलं जातंय.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *